IPL Auction 2025 Live

IPL 2020: रोहित शर्माला सचिन तेंडुलकर आणि शॉन पोलॅक पुन्हा हवे आहेत मुंबई इंडियन्स संघात, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर (See Tweet)

मुंबई इंडियन्सच्या निवृत्त खेळाडूंपैकी एका खेळाडूला संघात पुन्हा घ्यायची संधी मिळाली तर तू कोणाची निवड करशील? या प्रश्नावर रोहितने सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॅक यांना निवडले.

सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty/Instagram)

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) अखेर इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामना खेळून 7 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे पण तरीही तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ध्वजवाहक मानला जातो. सोमवारी माजी कर्णधाराने जो अजूनही मुंबई फ्रँचायझीचा सदस्य आहे त्याने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) विशेष इच्छेला प्रतिसाद दिला. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहितने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची नुकतेच ट्विटरवर प्रश्नोत्तरांचं सत्र घेतलं. त्यात त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. या दरम्यान, त्याला विचारण्यात आलं की जर तुला मुंबई इंडियन्सच्या निवृत्त खेळाडूंपैकी एका खेळाडूला संघात पुन्हा घ्यायची संधी मिळाली तर तू कोणाची निवड करशील? या प्रश्नावर रोहितने उत्तर देत म्हणाला, “जर मला अशी संधी देण्यात आली तर मी एकाऐवजी दोन खेळाडूंना संघात परत घेईन. ते दोन खेळाडू म्हणजे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॅक (Shaun Pollock).” (सुरेश रैनाने एमएस धोनी-रोहित शर्माची केली तुलना, पुढचा धोनी म्हणून टॅग केल्यावर 'हिटमॅन' म्हणाला-'असं होऊ नये')

रोहित 2011 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आणि सचिनबरोबर फ्रँचायझीसाठी खेळला. मात्र, या दोन्ही फलंदाजांना एकत्र सलामीला येण्याची संधी मिळाली नाही. रोहितच्या या टिप्पणीला उत्तर देताना सचिन म्हणाला की, आयपीएलमध्ये परतल्यास मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराबरोबर खेळण्याची मजा येईल. "रोहित तुझ्याबरोबर ओपन करण्यात मजा येईल", अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.

पाहा रोहितचा व्हिडिओ:

सचिनची प्रतिक्रिया

दुसरीकडे, शॉन पोलॉकनेही मुंबई इंडियन्सला म्हटले की जर त्याने आयपीएलच्या सामन्यात परत येण्याची इच्छा असल्यास तो जिममध्ये जाणार असल्याचे माजी दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटूने म्हटले. "हे शक्य असल्यास नेट्समध्ये जाऊन कसरत करेल," पोलॉकने लिहिले.

सचिनप्रमाणेच पोलॉकनेही मुंबई इंडियन्सची प्रशिक्षक आणि मार्गदर्शक भूमिका साकारल्या. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने 2009 मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आणि 2011 मध्ये त्यांनी मार्गदर्शक व गोलंदाजी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी सांगितले की, यंदा आयपीएल युएई येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळले जाईल.