Rohit Sharma Injury Update: प्ले-ऑफमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व करणार? पाहा काय म्हणाला किरोन पोलार्ड
दरम्यान, मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे बाहेर असल्यामुळे सध्या संघाचे नेतृत्व किरोन पोलार्ड (Kieron Pollard) करत आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) प्ले-ऑफ्सचे तिकीट मिळवलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे बाहेर असल्यामुळे सध्या संघाचे नेतृत्व किरोन पोलार्ड (Kieron Pollard) करत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये पोलार्डने रोहितची उणीव संघाला भासू दिली नाही. परंतु, मुंबई इंडियन्सच्या पुढील सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? असा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाला किरोन पोलार्डने पूर्णविराम लावला आहे. रोहितची दुखापत आता बरी होत आहे आणि आम्हाला आशा आहे की, तो लवकरच संघात पुनरागमन करेल, असे किरोन पोलार्ड म्हणाला आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 51 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात सर्वोकृष्ट कामगिरी करून मुंबई इंडियन्स विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ 18 गुणांसह अव्वल स्थानी पोहचली आहे. मुंबई इंडियन्स 3 सप्टेंबर रोजी आपला अखेरचा साखळी सामना हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही रोहितला विश्रांती देऊन तो प्ले-ऑफमध्ये खेळण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- RCB vs SRH, IPL 2020: आरसीबीच्या पराभवाची हॅटट्रिक! सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट 'विराट' विजय
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती. या दौऱ्यात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. परंतु, रोहित शर्माला वगळण्यात आल्यानंतर बीसीसीआय आणि निवड समितीवर टीका केली जात आहे. याबाबत बीबीसीसीआयने महत्वाची माहिती दिली आहे. रोहित शर्माच्या दुखापतीबाबत उद्या माहिती घेतली जाणार आहे. रोहित शर्मा तंदुरूस्त आहे की अद्याप दुखापतग्रस्त याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाणार, असे बीसीसीआयने म्हटले आहे.