IPL 2020: रॉबिन उथप्पाने केले BCCI नियमाचे उल्लंघन, KKR विरुद्ध सामन्यात बॉलवर लावली लाळ (Watch Video)
इंडियन प्रीमिअर लीग फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रॉबिन उथप्पाने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) नुकत्याच संपुष्टात आलेल्या सामन्यात कोरोना व्हायरसच्या पार्शवभूमीवर बनवण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करताना दिसला. उथप्पा सामन्यादरम्यान बॉलवर लाळ लावताना आढळून आला.
इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फलंदाज रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) नुकत्याच संपुष्टात आलेल्या सामन्यात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्शवभूमीवर बनवण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करताना दिसला. उथप्पा सामन्यादरम्यान बॉलवर लाळ लावताना आढळून आला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, आयसीसीने (ICC) बॉल चमकावण्यासाठी लाळ वापरण्याच्या (Saliva Ban) बंदीसह अनेक मार्गदर्शक तत्त्वे आणि अन्य प्रोटोकॉल जारी केले होते. कोविडमुळे युएईमध्ये (UAE) बंद दाराच्या मागे खेळल्या जाणाऱ्याआयपीएल (IPL) 2020 मध्ये बॉलवर लाळ वापरण्यास बंदी घातली गेली आहे. विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी ही बंदी घातली गेली आहे. तथापि, आतापर्यंत अशी बर्याच उदाहरणे आहेत ज्यात खेळाडूंनी चुकून बंदीचे उल्लंघन केले आहे. (RR vs KKR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सची हॅटट्रिक हुकली! KKRने 37 धावांनी विजय मिळवत रॉयल्सचा चारली पहिल्या पराभवाची चव)
शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात ताजी घटना घडली. केकेआर डावाच्या तिसर्या ओव्हरमध्ये उथप्पा चेंडू जयदेव उनाडकटकडे परत टाकण्यापूर्वी त्याच्यावर लाळ लावताना दिसला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. कोरोना विषाणूच्या काळात क्रिकेट सुरू झाल्यापासून आयसीसीने खेळाडूंना चेंडूवर लाळ वापरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. आता गोलंदाज चेंडूला घाम लावू शकतात, मात्र बॉल चमकण्यासाठी लाळ वापरू शकत नाहीत. पण उथप्पा हा नियम विसरला आणि चेंडूवर लाळ वापरली. दरम्यान, जर उथप्पा यापुढे चेंडूला लाळ वापरताना आढळ्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. पाहा या घटनेचा हा व्हिडिओ...
लाळ बंदीव्यतिरिक्त यूएईमध्ये जैव-सुरक्षित बबलमध्ये राहणाऱ्या खेळाडूंना इतर अनेक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या जगभरात झपाट्याने होणाऱ्या प्रसारामुळे संपूर्ण स्पर्धा भारताबाहेर नेण्यात अली आणि युएईमध्ये केवळ तीन ठिकाणी खेळवली जात आहे. आजच्या सामन्याविषयी बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात केकेआरने त्यांना 175 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, राजस्थानला 137 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि त्यांना 37 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)