Rishabh Pant Teases Ricky Ponting on Live Video: रिषभ पंतने लाईव्ह मुलाखती दरम्यान DC कोच रिकी पॉन्टिंगची काढली छेड, व्हायरल व्हिडिओवर यूजर्सच्या मिश्र प्रतिक्रिया
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आजच्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजी दरम्यान मुख्य प्रशिक्षक पॉन्टिंग कमेन्टरी टीमशी बोलत होते. या दरम्यान पंत पॉन्टिंगच्या मागे राहून त्यांच्या छेड काढताना दिसला. जस-जसे पॉन्टिंग बोलायचे तस-तसे पंत त्यांची नकल करत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यूजर्स त्याच्यावर मिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
Rishabh Pant Teases Ricky Ponting on Live Video: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या आवृत्तीत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने शानदार खेळ दाखवला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) आजच्या सामन्यात त्यांनी जबरदस्त फलंदाजी करत सीएसकेवर (CSK) 5 विकेटने मात केली. संघाचे वातावरण अत्यंत आश्चर्यकारक आहे आणि यासाठी सर्व प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना श्रेय देत आहेत. दुखापतीमुळे मागील दोन सामन्यांना मुकलेला विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) चेन्नईविरुद्ध खेळण्याची अपेक्षा होती पण प्लेइंग इलेव्हन त्याला संधी मिळाली नाही. दुखापतीमुळे सलग तिसऱ्या सामन्याला मुकलेला पंत संघाबरोबर सामन्यावेळी डग-आउटमध्ये बसून सर्वांचे प्रोत्साहन करत होता. दिल्लीच्या फलंदाजीदरम्यान एक मजेशीर प्रसंग पाहायाला मिळाला. डगआऊटमध्ये बसलेला पंत कोच पॉन्टिंगबरोबर मजा करताना दिसला. दिल्लीच्या फलंदाजी दरम्यान मुख्य प्रशिक्षक पॉन्टिंग कमेन्टरी टीमशी बोलत होते. या दरम्यान पंत पॉन्टिंगच्या मागे राहून त्यांच्या छेड काढताना दिसला. (DC vs CSK, IPL 2020: शिखर धवनचा मास्टर स्ट्रोक! 'गब्बर'च्या शतकाने दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेटने केली मात)
या मुलाखतीदरम्यान पंत प्रशिक्षकाच्या मागे गेला आणि मस्ती सुरु केली. जस-जसे पॉन्टिंग बोलायचे तस-तसे पंत त्यांची नकल करत होता. शेवटी समालोचन संघाने त्यांना सांगितले की आपल्या मागे कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. मागे वळून पाहिले असता पंतने तेथून पळ काढली. पाहा हा व्हिडिओ...
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यूजर्स त्याच्यावर मिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांना ही मजा आवडली असली तर काही पंतच्या वागणुकीला चुकीचं म्हणत आहे. पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
पंत आणि पॉन्टिंग
डिट्टो एक्सप्रेशन
आरामशीर आणि निरोगी वातावरण
आवडती टीम!!
दुसरीकडे, आजच्या सामन्यात शिखर धवनच्या नाबाद 108 धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेविरुद्ध 5 विकेटने विजय मिळवला आणि आयपीएलच्या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. धवन वगळता अक्षर पटेल (Axar Patel) 4 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या, कर्णधार श्रेयस अय्यरने 23 आणि मार्कस स्टोइनिसने 24 धावा केल्या. सीएसकेसाठी दीपक चाहरने सर्वाधिक 2 तर सॅम कुरन, ड्वेन ब्रावो, शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)