IPL 2020: MI विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी RCB कर्णधार विराट कोहलीने शेअर केली मोटिवेशनल पोस्ट, पाहून तुम्हीही सहमत व्हाल (View Post)
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघर्षपूर्ण सामन्यात विजय मिळवल्यावर आणि नंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध निराशाजनक पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम कर्णधार विराट कोहलीने एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आणि याची आरसीबी टीमला नक्की गरज आहे याबाबत तुम्ही देखील सहमत व्हाल. "युनिटी हे वाहन आहे, इच्छा ही इंधन आहे," असे विराटने पोस्टमध्ये लिहिले.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघर्षपूर्ण सामन्यात विजय मिळवल्यावर आणि नंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध निराशाजनक पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bagalore) टीम कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आणि याची आरसीबी टीमला नक्की गरज आहे याबाबत तुम्ही देखील सहमत व्हाल. विराटने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये संपूर्ण आरसीबी (RCB) टीम एकत्र उभे असल्याचे दिसू शकते. आरसीबीने आयपीएलमध्ये आजवर दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध त्यांनी विजय मिळवला असला तरी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) त्यांना 97 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. आता सोमवार, 28 सप्टेंबर रोजी आरसीबीचा सामना गतजेत्या मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होईल ज्यांनी नुकतंच युएई येथे खेळत आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला. (IPL 2020: 'मी घेतो या पराभवाची जबाबदारी', KXIP विरुद्ध लाजिरवाण्या अपयशानंतर RCB कर्णधार विराट कोहलीची कबुली)
मुंबई इंडियन्सविरुद्ध 'हायव्होल्टेच' सामन्यापूर्वी विराटने मोटिवेशनल पोस्ट शेअर केली जी टीमला आगामी सामन्यापूर्वी नक्की प्रेरक ठरेल. "युनिटी हे वाहन आहे, इच्छा ही इंधन आहे," सोमवारी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीच्या सामन्यापूर्वी विराटने पोस्टमध्ये लिहिले. पंजाबविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाची जबाबदारी नंतर कर्णधार कोहलीने घेतली आणि परभावाबद्दल बोलताना कोहली म्हणाला,“पहिल्या 15 ओव्हरपर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण त्यानंतर जे काही झालं त्यामुळे आम्ही पराभूत झालो. सर्वांसमोर उभं राहून मला या पराभवाची जबाबदारी घ्यावीच लागेल. माझ्या चुकीमुळे आमचं आव्हान 35 ते 40 धावांनी वाढलं. आम्ही पंजाबला 180 पर्यंत रोखू शकलो असतो आणि मग आमच्या फलंदाजीच्या वेळी पहिल्या चेंडूपासूनच आमच्यावर दडपण वाढलं नसतं.” पाहा विराटची प्रेरणादायी पोस्ट:
View this post on Instagram
Unity is the vehicle, desire is the fuel.
A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on
यापूर्वी युजवेंद्र चहलच्या फिरकीच्या जोरावर आरसीबीने सलामीच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध नाटकीय विजय मिळवला, पण मागील सामन्यात आरसीबीची कामगिरी प्रभावी ठरू शकली नाही. पंजाबविरुद्ध एकही फलंदाज मोठा डाव नाही तर चहल वगळता अन्य गोलंदाजी अपयशी ठरले. फील्डिंगच्या मुद्दय़ांनी आरसीबीच्या अडचणीत वाढ केली. पंजाबविरुद्ध कर्णधार कोहलीने सामन्यात दोन वेळा विक्रमी शतकवीर केएल राहुलचे कॅच सोडले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)