IPL 2020: CSK कर्णधार एमएस धोनीने 200व्या आयपीएल सामन्यानंतर RR हिरो जोस बटलरला दिली खास गिफ्ट, पाहा फोटो
जोस बटलर रॉयल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मात्र, सामन्यानंतर इंग्लिश क्रिकेटरला सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने आपली जर्सी बटलरला गिफ्ट म्हणून दिली. बटलर देखील ही जर्सी मिळाल्याने खूप आनंदी होता आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्य सिद्ध करते.
MS Dhoni 200th IPL Match: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सोमवारी आयपीएल (IPL) 2020 मधील 37व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) सहजतेने सात गडी राखून पराभूत केले. जोस बटलर (Jos Buttler) रॉयल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद 70 धावांच्या खेळीसह रॉयल्सला मिळालेले 126 धावांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र, सामन्यानंतर इंग्लिश क्रिकेटरला सर्वात खास भेट मिळाली, त्याचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) आपली जर्सी बटलरला गिफ्ट म्हणून दिली. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सोमवार, 19 ऑक्टोबर रोजी झालेला सामना धोनीच्या आयपीएल करिअरमधील 200वा सामना होता आणि धोनीला आर्दश मानणाऱ्या बटलरने या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली. सामन्याखेरीस धोनीला बटलरला त्याची 200व्या आयपीएल सामन्यातील जर्सी भेट म्हणून दिली. (MS Dhoni 200th IPL Match: आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा महेंद्र सिंह धोनी ठरला पहिला खेळाडू)
राजस्थान रॉयल्स सामन्यातील फिनिशर बटलर देखील ही जर्सी मिळाल्याने खूप आनंदी होता आणि त्याच्या चेहऱ्यावरील हास्य सिद्ध करते. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलने एमएस धोनीची जर्सी हातात घेतलेल्या बटलरचा एक फोटो शेअर केला आहे. प्रथम फलंदाजी करणार्या चेन्नई संघाने 5 विकेट्सवर केवळ 125 धावा केल्या. आयपीएलच्या 200 सामन्यात धोनीला चांगली कामगिरी करता आली नाही आणि 28 धावांवर धावबाद झाला. प्रत्युत्तरात राजस्थानने 17.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून लक्ष्य गाठले. बटलरने 48 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 70 धावा केल्या. पाहा बटलरचा व्हायरल होणार फोटो...
गेल्या आठवड्यात मनोरंजनाची मर्यादा ओलांडणारे सामने पाहायला मिळाले असताना या आठवड्याची सुरुवात एकतर्फी सामन्याने झाली. राजस्थान आणि चेन्नई यांच्यात रोमांचक सामना अपेक्षित होता कारण प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोघांना विजय मिळवणे आवश्यक होते. परंतु धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात निराशा केली आणि राजस्थान रॉयल्सने एकतर्फी कामगिरी करत विजय मिळवला. दरम्यान, 200 आयपीएल सामने खेळणारा धोनी जगातील पहिला क्रिकेटपटू बनला. रोहित शर्मा 197 सामन्यांसह दुसर्या आणि सुरेश रैना 193 सामन्यांसह तिसर्या क्रमांकावर आहे.