IPL 2020 Points Table Updated: MI विरुद्ध विजयानंतर SRH संघाचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश; KKR स्पर्धेतून बाहेर

दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह आयपीएल प्ले ऑफसाठी क्वालिफाय केले. दुसरीकडे, आजच्या सामन्यातील पराभवानंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अंतिम-4 संघात स्थान मिळवले. आता कोलकाताच्या प्ले ऑफची शक्यता स्पर्धेच्या 56व्या म्हणजे अखेरच्या साखळी सामन्यावर अवलंबून राहिली आहे.

आयपीएल 2020 नेट रन रेटसह पॉईंट्स टेबल

IPL 2020 Points Table Updated: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 56 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने (Sunrisers Hyderabad) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयामुळे हैदराबादचा संघाने प्ले-ऑफमध्ये (IPL PlayOffs) धडक दिली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ 18 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या क्रमाकांवर असून त्यांना 16 गुण आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (- 0.172), कोलकाता नाईट राईडर्स (-0.214) आणि सनरायजर्स हैदराबादच्या (+0.608) संघाचे प्रत्येकी 14 गुण आहेत. कोलकाताच्या तुलनेत हैदराबाद आणि बेंगलोरच्या संघाचे अधिक वजन आहे. ज्यामुळे कोलकाताचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

(IPL 2020 Orange Cap Holder List Updated: KXIP कर्णधार केएल राहुल अद्यापही ऑरेंज कॅपचा मानकरी, शतकवीर शिखर धवनची दुसऱ्या स्थानी झेप)

दरम्यान, बीसीसीआयने आयपीएलच्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 7 नोव्हेंबर रोजी दुबई येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता पहिला क्वालिफायर खेळला जाईल. हा सामना आयपीएल 2020 च्या गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी अबू धाबी येथे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघात एलीमिनेटर सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजला आयोजित केला जाईल.

नेट रन रेटसह अपडेटेड आयपीएल 2020 पॉइंट्स टेबल

Rank Team Played Won Loss Draw Net Run-Rate Points
Q मुंबई इंडियन्स 13 9 4 0 +1.186 18
Q दिल्ली कॅपिटल्स 14 8 6 0 -0.109 16
Q सनरायझर्स हैदराबाद 14 7 7 0 +0. 618 14
4 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 14 7 7  0 -0.172 14
5 कोलकाता नाईट राईडर्स 14 7 7 0 -0.214 14
6 किंग्ज इलेव्हन पंजाब 14 6 7 0 -0.162 12
7 चेन्नई सुपर किंग्ज 14 6 8 0 -0.455 12
8 राजस्थान रॉयल्स 14 6 8 0 -0.569 12

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्यांच्या नावावर चार विजेते आहेत तर चेन्नई सुपर किंग्जने तीन जिंकली आहेत. केवळ कोलकाता नाइट रायडर्स (2012 आणि 2014), सनरायझर्स हैदराबाद (2016) आणि राजस्थान रॉयल्स (2008) विजेतेपद जिंकणारे इतर संघ आहेत. आता नाउमेद झालेल्या डेक्कन चार्जर्सने 2009 मध्ये जेतेपद जिंकले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif