IPL 2020 साठी मुंबई इंडियन्स संघाची नवी जर्सी लॉन्च (Watch Video)

आयपीएलच्या 13 व्या सीजनसाठी मुंबई इंडियन्स संघाची नवी जर्सी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली. हटके व्हिडिओ शेअर करत जर्सी सर्वांसमोर सादर करण्यात आली आहे.

IPL 2020 साठी मुंबई इंडियन्स संघाची नवी जर्सी लॉन्च (Watch Video)
Mumbai Indians New Jersey for IPL 2020 (Photo Credits: Twitter)

आयपीएलच्या 13 (IPL 13th Season) व्या सीजनसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची नवी जर्सी (New Jersey) आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली. हटके व्हिडिओ शेअर करत जर्सी सर्वांसमोर सादर करण्यात आली आहे. नवीन MI जर्सी घालून पाण्याखाली डान्स करत असलेला हायड्रोमॅन या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सच्या थीम सॉन्गवर या हायड्रोमॅनने ताल धरला आहे. ही जर्सी निळ्या (Blue) आणि सोनेरी (Gold) रंगात पाहायला मिळत आहे. (आयपीएलमधील एका संघाच्या 2 खेळांडूसह 13 जणांना कोरोनाची लागण; बीसीसीआयची माहिती)

मुंबई इंडियन्सची ही नवी जर्सी तुम्ही https://bit.ly/2DalFTL या साईटवरुन प्री-ऑर्डर करु शकता. गतवर्षीची आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केल्यानंतर यंदाच्या वर्षी देखील मुंबई इंडियन्सने आयपीएल वर्ल्डकप जिंकावा, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. 2013, 2015, 2017 आणि 2019 या चार आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा 2020 ची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचाही मानस आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघामध्ये हार्दिक पांड्या, जसप्रित बुमराह, पोलार्ड आणि मल्लिंगा यांसारखे लोकप्रिय खेळाडू आहेत. 19 सप्टेंबरपासून UAE मध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे.

Mumbai Indians Tweet:

आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स संघाची विजेतेपद पटकवण्याची शक्यता अधिक आहे. परंतु, संघातील गोलंदाज दीपक चाहर हा कोरोना बाधित आढळल्याने आणि सुरेश रैना याला वैयक्तिक कारणास्तव भारतात परत यावे लागल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. तरीही धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल जिंकण्याचा चेन्नई सुपर किंग्स पुरेपूर प्रयत्न करतील.

(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2020 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).