IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सने केलेल्या ट्विटने वादाला सुरुवात, फिक्सिंगच्या चर्चांना उधाण, पाहा Post
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे, परंतु त्यांच्या हटविलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावरुन वाद ओढवल्यामुळे चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलने दिल्ली कॅपिटलच्या अंतिम डावातील धावसंख्या सामना सुरु होण्याच्या आठ मिनिटांआधीच ट्विट केली ज्याने सर्वांचे लक्ष वेधले.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) मॅच फिक्सिंग (Match Fixing) हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे, परंतु त्यांच्या हटविलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावरुन वाद ओढवल्यामुळे चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)) ट्रोल करण्यास सुरुवात केली. रविवार, 11 ऑक्टोबर रोजी आयपीएल 2020 च्या रोमांचकारी सामन्यात एमआयने (MI) दिल्ली कॅपिटलस (Delhi Capitals) 5 विकेट्सने पराभूत केले. मात्र, मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलने दिल्ली कॅपिटलच्या अंतिम डावातील धावसंख्या सामना सुरु होण्याच्या आठ मिनिटांआधीच ट्विट केली ज्याने सर्वांचे लक्ष वेधले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अंतिम स्कोअरही एकसारखा होता. त्यांच्या हटवलेल्या ट्विटमध्ये, एमआयने अंदाज व्यक्त केला होता की डीसीची धावसंख्या 5 बाद 163 अशी असेल आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी पहिल्या डावात 4 बाद 162 धावा केल्या. (MI vs DC, IPL 2020: क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकाने मुंबई इंडियन्स टॉप वर, दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेटने मिळवला एकतर्फी विजय)
मात्र, नंतर हे ट्विट त्वरित डिलीट करण्यात आले परंतु काही चाहत्यांनी चपळता दाखवली आणि त्याचा स्क्रीनशॉट घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केला. मुंबई इंडियन्सचे हे ट्विट वादात अडकले आणि यूजर्समध्ये फिक्सिंगच्या चर्चांना उधाण आले. पाहा ट्विट...
या सामन्यात 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही आणि कर्णधार रोहित शर्मा फक्त 5 धाव करून माघारी परतला. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार भागीदारी रचली कारण दोघांनी धावसंख्या चांगल्या वेगाने पुढे नेली. डी कॉकने काही उत्कृष्ट शॉट्स खेळत 33 चेंडूत अर्धशतक झळकावले, आर अश्विनने फलंदाजाला 53 धावांवर माघारी पाठवले. तिसर्या विकेटसाठी यादव आणि ईशान किशनची संक्षिप्त भागीदारी केली पण त्यांनी अस्किंग रेटही नियंत्रणात ठेवला. या दरम्यान सूर्यकुमारने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले, पण त्वरित कगिसो रबाडाकडे झेलबाद झाला. रबाडाने नंतर 28 धावांवर खेळणाऱ्या किशनलाही माघारी धाडले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)