IPL 2020 Live Streaming Online on Mobile: आयपीएल 13 साठी Jio आणि Airtel ने दिले Disney+Hotstar फ्री सब्सक्रिप्शन प्लान
IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2020 Live Streaming Online on Mobile: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राचे शुभारंभ शनिवार, म्हणजेच आजपासून होत आहे. या मोसमातील पहिला सामना संयुक्त अरब अमीरातमधील (United Arab Emirates) अबू धाबी (Abu Dhabi) येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर (Sheikh Zayed Cricket Stadium) गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाईल. स्टार स्पोर्ट्स आयपीएल (IPL) 2020 चे अधिकृत प्रसारक आहे. 53 दिवस चालणाऱ्या या स्पर्धे दरम्यान स्टार स्पोर्ट्स (Star Sports) ऑनलाइन स्ट्रीमिंगव्यतिरिक्त थेट प्रक्षेपण देखील प्रदान करेल.  या व्यतिरिक्त, ड्रीम 11 आयपीएलचे सर्व सामने Disney+ Hotstar VIP वर देखील पहिले जाऊ शकतात. यंदा आयपीएलचे सामने पाहण्यासाठी Disney Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन असणे गरजेचे आहे. यासाठी रिलायन्स आणि एअरटेल त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर देत आहेत. (MI vs CSK, IPL 2020 Live Streaming: कधी आणि कुठे बघता येईल मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील पहिल्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग)

आपणास सब्सक्रिप्शन घ्यायचे नसेल तर Disney+ Hotstar VIP वर तुम्ही आयपीएलचा आनंद घेऊ शकता. रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या काही रिचार्ज ऑफरमध्ये Disney+ Hotstar VIPचे सब्सक्रिप्शन ऑफर उपलब्ध असतील.

आयपीएल 2020 साठी Jioचे Disney+Hotstar फ्री सबस्क्रिप्शन प्लॅनः

Plan

Data

Validity

Disney+Hotstar

MRP 401

3 GB/Day

28 Days

1 Year Free

MRP 499

1.5 GB/Day

56 Days

1 Year Free

MRP 598

2 GB/Day

56 Days

1 Year Free

MRP 777

1.5 GB/Day

84 Days

1 Year Free

MRP 2599

2 GB/Day

365 Days

1 Year Free

आयपीएल 2020 साठी Airtelचे Disney+Hotstar फ्री सबस्क्रिप्शन प्लॅनः

Plan

Data

Validity

Disney+Hotstar

MRP 401

30 GB

28 Days

1 Year Free

MRP 448

3 GB/Day

28 Days

1 Year Free

MRP 599

2 GB/Day

56 Days

1 Year Free

MRP 2698

2 GB/Day

365 Days

1 Year Free

दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या आयपीएलचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. आयपीएल 2020 मध्ये एकूण 60 सामने खेळले जातील. यावेळी आयपीएलचा अंतिम सामना रविवारी नव्हे तर वर्किंग डे दरम्यान खेळला जाईल.