IPL 2020 Could Be Cancelled: आयपीएल 2020 रद्द होण्याची शक्यता, PCB चा सप्टेंबर-ऑक्टोबर विंडो दरम्यान कोलंबोमध्ये आशिया चषक आयोजित करण्याचा प्रयत्न

आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एशिया कप खेळल्यास बीसीसीआयला आयपीएल रद्द करावे लागेल.

आयपीएल ट्रॉफी आणि पीसीबी लोगो (Photo Credits: PTI and PCB)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग आणि आशिया चषक स्पर्धांवरील अनिश्चितता अजूनही वाढतच आहे. कोरोना व्हायरस उद्रेकानंतर मूळ मार्च-एप्रिलमध्ये होणारी आयपीएल 2020 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. शिवाय, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या भविष्याबाबतही आयसीसीने अद्याप निर्णय घेतला नाही. टी-20 विश्वचषक पुढे ढकलल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) आयपीएल 2020 आयोजित करण्याची विंडो असेल. यावर्षी टी-20 वर्ल्ड कप रद्द होईल आणि सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल 2020 चे आयोजन केले जाईल असे आहे. तथापि, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आयपीएलच्या आयोजनामध्ये अडथळा बानू शकतो आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यंदा आशिया चषक खेळण्यावर जोर देत आहे. आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एशिया कप खेळल्यास बीसीसीआयला आयपीएल रद्द करावे लागेल. (IPL 2020 Update: क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर! 26 सप्टेंबरपासून सुरु होऊ शकतो आयपीएलचा थरार, 'या' दोन शहरांमध्ये आयोजित केले जाऊ शकतात सर्व सामने)

डिसेंबरमध्ये भारत ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार असल्याने भारतीय बोर्ड ही स्पर्धा पुढे ढकलू शकत नाही आणि क्वारंटाइन कालावधीमुळे संघाला महिन्याभरापूर्वीच पोहोचावे लागणार आहे. दरम्यान, इनसाइडस्पोर्ट अहवालानुसार पीसीबी आयपीएलसाठी आशिया चषक रद्द करण्याच्या मूडमध्ये नाही.पाकिस्तानकडे या स्पर्धेचे मुख्य अधिकार असून ते श्रीलंकेमध्ये होस्ट करण्याची शक्यता आहे.

“घरगुती लीगसाठी पीसीबी आशिया कप टी-20 विंडो कशी सोडू शकेल. आशिया चषक टी-20 चे आयोजन वेळोवेळी आयोजित केल्या गेलेल्या सदस्यांमध्ये ठरल्याप्रमाणे केले जाईल. पीसीबीच्या अर्थसहाय्यांसाठी आणि एसीसी सदस्य बोर्डाच्या वाढीसाठी हे महत्वाचे व गंभीर आहे”, InsideSport ने पीसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. अहवालात पुढे म्हटले आहे की, एसीसी (एशियन क्रिकेट कौन्सिल) चे सदस्य कोलंबोकडे आशिया चषकचे संभाव्य ठिकाण पहात आहेत आणि पुढील दूरसंचारात ते औपचारिकरित्या जाहीर केले जाईल. दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) पुन्हा एकदा पुष्टी केली की पीसीबीने त्यांना होस्टिंग अधिकार दिले आहेत.



संबंधित बातम्या

IND vs SA 4th T20I 2024 Preview: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20 मध्ये मोठ्या विजयाची वाट, हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई आणि स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून

AUS Beat PAK, 1st T20I Record: पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला, ग्लेन मॅक्सवेलचा कहर; आजच्या दिवशी झाले मोठे विक्रम

Australia Beat Pakistan, 1st T20I Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 29 धावांनी केला पराभव; AUS vs PAK सामन्याचे स्कोअरकार्ड पहा येथे

WI vs ENG 3rd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिज तिसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करेल की इंग्लंड मालिका ताब्यात घेणार, हेड टू हेड, खेळपट्टीचा अहवाल आणि लाईव्ह स्ट्रीमिंगबद्दल घ्या जाणून