IPL Auction 2025 Live

IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा कर्णधार Virat Kohli ला किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात Slow Over-Rate ठेवल्याने 12 लाखांचा दंड

क्षेत्ररक्षण करताना स्लो ओव्हर रेट ( Slow Over-Rate ) ठेवला असल्याने हा दंड झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरसीबी कर्णधार विराट कोहली (Photo Credit: PTI)

यंदा पहिल्यांदाच आयपीएलची धूम भारताबाहेर रंगत आहे. अनेक क्रिकेटर्स आणि चाहते देखील स्टेडियममधील तो थरारक 20-20 ओव्हर्सचा खेळ, क्षणाक्षणाला वाढणारी धाकधूक मिस करत आहेत. दरम्यान काल के एल राहुलच्या (KL Rahul) दमदार खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) क्रिकेटच्या मैदानात हरवलं. दरम्यान या सामन्यामध्ये खराब फिल्डिंगमुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामना गमावला अशी चर्चा आहे. या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधाराला विराट कोहलीला (Virat Kohli) 12 लाखांचा दंड झाला. क्षेत्ररक्षण करताना स्लो ओव्हर रेट ( Slow Over-Rate ) ठेवला असल्याने हा दंड झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आयपीएल सीझन 13 मध्ये काल पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव झाला आहे. तसेच ही संघाकडून झालेली पहिलीच चूक असल्याने दंडाची रक्कम 12 लाख असल्याचे आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडीयामधील प्रतिक्रिया

विराट कोहलीच्या संघाकडून के एल राहुल याची दोनदा कॅच सुटली होती. दरम्यान या जीवनदानामुळे त्याला मोठी खेळी करत 97 धावांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवता आलं. दरम्यान विराटने दिलेल्या प्रतिक्रियेमध्येही त्याने सांगितले आहे, ' पहिल्या 15 ओव्हर्समध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. मात्र नंतर आम्ही गडगडत गेलो. या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. आम्ही पंजाबला 180 मध्येच रोखू शकलो असतो पण माझ्या चूकीमुळे हे दडपण वाढलं'.