IPL 2020: कोट्याधीश यशस्वी जयस्वाल याच्या 'प्रेरणादायक' प्रवासाची प्रीती झिंटा कडून प्रशंसा, म्हणाली 'आयपीएल हे स्वप्नपूर्तीचे व्यासपीठ'
विशेष म्हणजे, किंग्ज इलेव्हन पंजाब या टीमच्या सह-मालक, बॉलीवूड अबिनेटरी प्रीती झिंटा हिने जयस्वालच्या ‘प्रेरणादायक’ प्रवासाचे कौतुक केले.
एखादा ‘चायवाला’ जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर पाणीपुरी विक्रेता नक्कीच स्टार क्रिकेटर होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाच्या 51 व्या वर्षी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते, तर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) अवघ्या 17 व्या वर्षी लक्षाधीश झाला आहे. गुरुवारी कोलकातामध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan) यशस्वीसाठी 2 कोटी 40 लाखांची बोली लावली. विशेष म्हणजे, किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) या टीमच्या सह-मालक, बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) हिने जयस्वालच्या ‘प्रेरणादायक’ प्रवासाचे कौतुक केले. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू ठरला, तर भारताच्या युवा खेळाडूंनादेखील चांगला भाव मिळाला. अंडर-19 विश्वचषकसाठी भारताच्या कर्णधारपदी नियुक्त झालेल्या प्रियम गर्ग याच्यापासून विराट सिंह रवी बिश्नोई यासारख्या खेळाडूंना मोठी रक्कम देऊन खरेदी करण्यात आले. यंदाच्या लिलावात सर्वाधिक चर्चा झाली ती यशस्वीच्या बोलीची. (IPL 2020 Auction: मुंबईतील पाणीपुरी विक्रेता ठरला 2 कोटी 40 लाख रुपयांचा मालक; Yashasvi Jaiswal याची हटके कहाणी)
लिलावादरम्यान, किंग्स इलेव्हनची सह-मालक प्रीतीने ट्विटरवर लिहिले की, "17 वर्षांची यशस्वी जयस्वाल 2 वर्षांपूर्वी जीविकेसाठी रस्त्यावर पाणीपुरी विकायचा. आज या प्रतिभावान क्रिकेटपटूला आयपीएल लिलावात एका फ्रँचायझीने 2.40 कोटीमध्ये खरेदी केले. विलक्षण आणि प्रेरणादायक कहाणी, आयपीएल खरोखर एक अशी जागा आहे जिथे स्वप्ने सत्यात उतरतात." यशवी अवघ्या 11 वर्षाचा असताना उत्तर प्रदेशातून मुंबईला आला होता. टीम इंडियाच्या अंडर-19 संघात झेले तेव्हा मेहनताचे फळ त्यांला मिळाले. आता तो पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. शिवाय, यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने 112.80च्या सरासरीने 564 फाटकावल्या आणि याच स्पर्धेत घरगुती क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला.
पंजाबबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी ग्लेन मॅक्सवेल, क्रिस जॉर्डन, शेल्डन कोटरेल, जिमी नीशम, प्रभसिमरन सिंह, तजिंदर सिंह ढिल्लन, ईशान पोरेल, रवी बिश्नोई आणि दीपक हूडा यासारख्या खेळाडूंची खरेदी केली. मॅक्सवेलला पंजाबने 10.50 कोटी रुपयात खरेदी केले.