IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; कर्णधार रोहित शर्मा आयपीएल मधून बाहेर होण्याची शक्यता
या हंगामात मुंबईच्या संघ 14 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.
आयपीएलच्या तेराव्या (IPL 2020) हंगामात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. या हंगामात मुंबईच्या संघ 14 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यातच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकतेच बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली असून यात रोहित शर्माचे नाव नाही. रोहित शर्मा हा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याची संघात निवड करण्यात आली नाही, अशी माहिती निवड समितीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीची सोमवारी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय तर, 4 कसोटी सामने खेळणार आहेत. दरम्यान, बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. हे देखील वाचा- India Tour Of Australia 2020: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा संघाबाहेर तर, IPL मधील 'या' खेळाडूंना संघात स्थान
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे वैद्यकीय पथक रोहित शर्माच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे, असे बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी म्हटले आहे. जर तो दुखापतीतून बरे झाला तर, त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. तथापि, ऑस्ट्रेलिया दौर्यावर तो संघासह प्रवास करेल की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही, असेही ते म्हणाले आहेत.
पंजाबविरुद्धच्या दुहेरी सुपर ओव्हर सामन्यादरम्यान रोहित शर्मा जखमी झाला. त्यानंतर कायरन पोलार्डने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईच्या संघाचे नेतृत्व केले आहे.रोहितच्या दुखापतीसंदर्भात अद्याप फ्रेंचायझी संघाने कोणतीही माहिती दिली नाही.