IPL 2020 Auction: आयपीएलकडून क्रिकेटपटूंच्या लिलावाची यादी जाहीर; विराट आणि रॉबिन उथप्पा सह 332 खेळाडूंवर लागणार बोली
इंडियन प्रीमिअर लीग 2020 च्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावधी अंतिम यादी जाहीर झाली आहे. आयपीएलने एकूण 332 क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली ज्यांच्यावर 19 डिसेंबरला कोलकातामध्ये 8 फ्रँचायसी बोली लावतील.
इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 च्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावधी अंतिम यादी जाहीर झाली आहे. आयपीएलने (IPL) एकूण 332 क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली ज्यांच्यावर 19 डिसेंबरला कोलकातामध्ये 8 फ्रँचायसी बोली लावतील. सर्वाधिक राखीव किंमत म्हणून 2 कोटींच्या ब्रॅकेटमध्ये सात परदेशी खेळाडू- पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, ख्रिस लिन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेल स्टेन आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी या सर्वाधिकप्राईसच्या ब्रॅकेटमध्ये स्थान मिळवले आहे. लिलाव यादीमध्ये रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याची मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे. पियुष चावला, युसुफ पठाण आणि जयदेव उनाडकट या इतर भारतीय स्टारची बेस प्राईस 1 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी कोलकातामध्ये एकूण 971 (713 भारतीय आणि 258 परदेशी) खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. उपलब्ध असलेल्या 73 जागा भरण्याचे लक्ष्य ठेवून 215 कॅप्ड प्लेअर, 754 अनकॅप्ड खेळाडूंचाही यात समावेश होता. अंतिम 332 खेळाडूंची यादी सर्व 8 संघांच्या व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावात शॉर्टलिस्टेड खेळाडूंमध्ये 24 नवीन खेळाडू आहेत. (IPL 2020 Auction Live Streaming: किती वाजता सुरु होणार लिलाव? पहा लाईव्ह स्ट्रीमिंग Star Sports नेटवर्कवर, जाणून घ्या किती खेळाडूंवर लागणार बोली)
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यादरम्यान चर्चेत आलेला केसरिक विल्यम्स, बांगलादेशचा मुश्फिकूर रहीम, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पा, इंग्लंडचा 21 वर्षीय विल जॅक्स यांसारख्या 24 नवोदित खेळाडूंची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. दुसरीकडे, मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून अनिश्चित वेळेसाठी विश्रांती घेतलेला ऑस्ट्रेलियाचा धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.
दरम्यान, यंदाचा लिलाव सकाळी 10:00 ऐवजी भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन (3:30) वाजता सुरु होईल. अधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रसारक आणि मंडळाने लिलाव प्राइम-टाईम स्लॉटमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)