IPL 2019: CSK v RCB -  शेवटचा सेकंद आणि एम एस धोनी याने घेतला Review; व्हिडिओ पाहाच

त्याचा संघ अवघ्या 70 धावांवर सर्वबाद ठरला. विराट कोहली 6 धावा काडून तंबूत परतला. पार्थिव पटेल 29, डीविलयर्स -9, शिमरोन हेटमायर - 0, शिवम दुबे 2, कॉलिन डी ग्रॅंडहोम 4, नवदीप सैनी 2, उमेश यादव 0, युजवेंद्र चहल 4 इतकी सुमार कामगिरी करुन कोहलीचे सवंगडी तंबूत परतले.

MS Dhoni of Chennai Super Kings (Photo Credits: Getty Images/File Image)

IPL 2019 - CSK v RCB: केवळ क्रिकेटप्रेमीच नव्हे तर, अवघ्या क्रिडा रसिकांना आनंदाची पर्वणी देणाऱ्या इंडियन प्रिमियर लिग (Indian Premier League) अर्थातच IPL 2019 च्या 12व्या पर्वाला शनिवारी (23 मार्च 2019) सुरुवात झाली. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला गेला. पहिल्याच सामन्यात एम एस धोनी ( M S Dhoni )  याच्या सीएसके संघाने विराट कोहली (Virat Kohli) याच्या आरबीसी संघाला 7 गडी राखून धूळ चारली. या सामन्यात धोनीचे दमदार नेतृत्व दिसून आले. पण, सर्वांनाच आश्चर्यचकीत केले धोनीच्या एका निर्णयाने.

घडले असे की, सामना तसा रंगात आला होता. आकरावे षटक सुरु होते. आरसीबी फलंदाजी करत होता. आरसीबीचे 6 गडी आगोदरच तंबूत परतले होते आणि धावसंख्या होती 56. तर, सीएसके संघाकडून इमरान ताहिर गोलंदाजी करत होता. स्ट्राईकला आरसीबीचा फलंदाज नवदीप सैनी होता.

इमरान ताहिर याने चेंडू टाकला. नवदीपने चेंडू आडविण्याचा आणि टोलविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतू, त्यात त्याला यश आले नाही. चेंडू नवदीपच्या पॅडला लागला. इमरान ताहिर याने पंचांकडे पायचित बाद (Legout) आपील केले. मात्र, पंचानी नॉटआऊट दिले. आता डीआरएस घ्यायची वेळ होती. अनुभवसंपन्न धोनी हे जाणून होता की, नवदीप लेगआऊट तर नाही. पण, तो कॅचआऊट नक्कीच असू शकतो. धोनीने रिव्ह्यू मागवला. रिव्ह्यूमध्ये धोनीची मागणी अचूक ठरली. त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की, डीआरएस घेण्यासाठी त्याला का ओळखले जाते.

विशेष म्हणजे धोनीने हा निर्णय अगदी शेवटी म्हणजे शेवटच्या क्षणाला घेतला. डीआरएस घेण्यासाठी जेव्हा केवळ एक सेकंद बाकी होता. तो सेकंद अचूक वापरत धोनीने मागणी केली. या सामन्यात इमरान ताहिर याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या 4 षटकांमध्ये केवळ 9 धावा दिल्या. तसेच, 3 गडीही बाद केले. मधल्या काळात त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. (हेही वाचा, IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 7 गडी राखून दणदणीत विजय)

ट्विट

विराट कोहलीसाठी मात्र हा सामना फारसा खास राहिला नाही. त्याचा संघ अवघ्या 70 धावांवर सर्वबाद ठरला. विराट कोहली 6 धावा काडून तंबूत परतला. पार्थिव पटेल 29, डीविलयर्स -9, शिमरोन हेटमायर - 0, शिवम दुबे 2, कॉलिन डी ग्रॅंडहोम 4, नवदीप सैनी 2, उमेश यादव 0, युजवेंद्र चहल 4 इतकी सुमार कामगिरी करुन कोहलीचे सवंगडी तंबूत परतले. पार्थीव पटेल (29) वगळता एकालाही दुहेरी अंकाची धावसंख्या उभारता आली नाही.