India's 5th Test Likely Playing XI: निर्णायक टेस्टसाठी टीम इंडियात होऊ शकतात दोन महत्वपूर्व बदल, असा असू शकतो संभाव्य संघ

आता टीम इंडियाचे लक्ष मालिका काबीज करण्यावर आहेत. पाचवा आणि शेवटचा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. कर्णधार विराट कोहली पाचव्या कसोटी सामन्यात बदल करू शकतो.

भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने  (Team India) इंग्लंडचा 151 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडियाचे लक्ष मालिका काबीज करण्यावर आहेत. आता मालिका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचली असून पाचवा आणि शेवटचा सामना 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर (Old Trafford Ground) खेळला जाईल. कर्णधार विराट कोहली पाचव्या कसोटी सामन्यात बदल करू शकतो. तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या देखील फिटनेसबाबत संशयास्पद वातावरण कायम आहे. रोहित आणि पुजारा यांना चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी दरम्यान दुखापत झाली ज्यामुळे दोघे अखेरीस मैदानात फिल्डिंगसाठी उतरले नव्हते. त्यामुळे पाचव्या निर्णायक टेस्ट सामन्यापूर्वी दोघांच्या फिटनेस अपडेट अपेक्षित आहे. (England's 5th Test Likely Playing XI: इंग्लंडला मालिका ड्रॉ करण्याची अंतिम संधी, मँचेस्टरवर या 11 धुरंधरांसह मैदानात उतरू शकते ब्रिटिश टीम)

पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत कर्णधार विराट कोहली मोहम्मद सिराज आणि अजिंक्य रहाणेला विश्रांती देऊ शकतो. रहाणेला विश्रांती दिल्यास त्याच्या जागी हनुमा विहारीला संधी दिली जाऊ शकते. विहारीने 12 कसोटी सामन्यांमध्ये 32.84 च्या सरासरीने आतापर्यंत 624 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध सध्याच्या कसोटी मालिकेत रहाणेने तिसऱ्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये एकूण 28 धावा केल्या. रहाणेने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न कसोटीत भारतासाठी शेवटचे शतक झळकावले होते. दुसरीकडे, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत सिराजला फारशी अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या कारणास्तव, टीम इंडिया शेवटच्या कसोटीत सिराजऐवजी अनुभवी मोहम्मद शमीला संघात समाविष्ट करू शकते. तसेच रविचंद्रन अश्विन देखील एक पर्याय उपलब्ध असेल. ओव्हल कसोटीतील या दोन खेळाडूंना वगळता सर्व सदस्यांनी त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. या मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडिया एकीकडे 3-1 ने ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, यजमान संघ इंग्लंडला ही मालिका 2-2 ने सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतील.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन) केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे/हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज/मोहम्मद शमी, उमेश यादव.