IND vs SA: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघाची होवू शकते लवकरच घोषणा, या खेळाडूंना मिळू शकते संधी

याशिवाय, अ संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा पूर्ण करेल तेव्हा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला जाईल. तेथे ज्या खेळाडूंची कामगिरी चांगली असेल त्यांची वरिष्ठ संघात निवड होऊ शकते.

Team India (Photo Credit - Twitter)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा पुढील आठवड्यापर्यंत होणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. याशिवाय, अ संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा पूर्ण करेल तेव्हा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला जाईल. तेथे ज्या खेळाडूंची कामगिरी चांगली असेल त्यांची वरिष्ठ संघात निवड होऊ शकते. विश्वचषक संपल्यानंतर वनडे मालिकेला तितकेसे महत्त्व दिले जाणार नाही. मात्र, टी-20 मालिकेसाठी अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संघाने तयारी सुरू केली आहे.

भारतीय संघाची लवकरच होणार घोषणा - रिपोर्ट

टी-20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंची निवड होते की नाही हे पाहणे बाकी आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले, सोमवारी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. बर्‍याच गोष्टींवर चर्चा करायची आहे पण कसोटीपूर्वी आम्हाला टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळायचे आहेत, त्यामुळे संघ त्याभोवती असेल. (हे देखील वाचा: IND vs AUS, 4th T20 Pitch Report: रायपूरमध्ये खेळवला जाणार चौथा टी-20 सामना, जाणून घ्या खेळपट्टी आणि हवामानाचा अहवाल)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडिया अशी असू शकते: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, संजू सॅमसन/तिलक वर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.