India vs England ICC Women’s T20 World Cup 2020 Semi-Final: सिडनी क्रिकेट मैदानावर पावसाचे सावट; जाणून घ्या कोणता संघ जाणार फायनलमध्ये?

हा सामना ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट मैदानात होणार आहे. परंतु, सिडनी पावसाचे सावट असल्याने हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

Indian Women Team 2018 Photo Credit : Twitter

महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील (Women's T20 World Cup 2020) पहिला सेमीफाइनल सामना भारत आणि इंग्लंड (IND Women vs England Women) यांच्यात आज रंगणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट मैदानात (Sydney Cricket Ground) होणार आहे. परंतु, सिडनी पावसाचे सावट असल्याने हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. याआधी पावसामुळे सिडनी मैदानात खेळले जाणारे दोन्ही सामने मंगळवारी रद्द झाले होते. जर आजचा सामना रद्द झाल्याचा याचा फायदा कोणत्या संघाला मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर हा सामना रद्द झाल्यास भारतीय संघ फायनलमध्ये धडक देणार आहे. आसीसीच्या नियमानुसार, सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत अव्वल असणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेत भारतीय संघ 'अ' गटात तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ 'ब' गटात अव्वल स्थानी आहेत. यामुळे आजचे दोन्ही सामने रद्द झाल्यास फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ 8 मार्चला मेलबर्न मैदानात एकमेकांशी भिडतील.

महिला टी-20 विश्वचषक 2020 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकाच्या संघाने सर्वोकृष्ट कामगिरी केल्यामुळे याचा फायदा दोन्ही संघाला मिळत आहे. जर सेमिफायनल सामन्यात पाऊस आला तर, दोन्ही संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने आसीसीकडे राखीव दिवसाची मागणी केली होती. परंतु, ही मागणी आसीसीने फेटाळली असून केवळ फायनलमध्येच राखीव दिवस ठेवण्यात आल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. विश्वचषकाच्या दरम्यान दोन्ही संघ 5 वेळा आमनेसामने आली आहे. परंतु, या पाचही सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. आता पर्यंत 6 विश्वचषक स्पर्धा पार पडले. दरम्यान, भारतीय संघाने कोणत्याच विश्वचषकात फायनल मध्ये प्रवेश करता आला नाही. भारतीय संघ 3 विश्वचषकात (2009, 2010, 2018) सेमीफायनलमध्ये जाऊन पराभूत झाले आहे. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाने 4, तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या संघाने एका विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. हे देखील वाचा- हार्दिक पांड्याची डीवाय पाटील टी 20 स्पर्धेत वादळी खेळी: 37 चेंडूत झळकावले शतक; पहा व्हिडिओ 

भारतः हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमीमा रॉड्रिग्ज, दीक्षित शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, शिखाडे, तानिया भाटिया (विकेटिकर), अरुंधती रेड्डी, पूनमप्त, राजेश्वरी गायकवाड, चंद्र राधावत.

इंग्लंड: हीदर नाइट (कर्णधार), टेमी बैमोंट, कॅथरीन ब्रंट, कॅट क्रॉस, फ्रेडा डेविस, सोफी एक्लेस्टन, जॉर्जिया एल्विस, आल ग्लैन, एमी जोन्स (विकेटिकर), नातली स्काइवर, भय्या श्रीबसोल, मेडी विल्यंस, डानी एट.