IND vs WI 1st ODI 2019: भारत-वेस्ट इंडिज मॅचमध्ये पावसाची बॅटिंग, सामना रद्द

आजच्या वनडे मॅचमध्ये पावसाने अनेकदा खलल घातला.

भारतीय संघ (Photo by Clive Mason/Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील पहिले वनडे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आजच्या वनडे मॅचमध्ये पावसाने अनेकदा खलल घातला. सुरुवातीला पावसामुळे टॉससाठी देखील उशीर झाला. त्यानंतर टॉस झाल्यावर देखील पावसानेच जास्त काळ बॅटिंग केली. पण पावसाचा जोर जास्त असल्यामुळे अखेरीस सामना रद्द करण्यात आला. दरम्यान, आजच्या सामन्यात टॉस जिंकून भारताने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये यश देखील मिळाले. फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल (Chris Gayle) याला बाद केले आणि स्वस्तात माघारी धाडले. आजच्या सामन्यात गेलला विक्रमाची संधी मिळाली होती. आतापर्यंत विंडीजसाठी वनडेमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम लाराच्या नावावर आहे. पण गेल हा लारापेक्षा गेल फक्त 11 धावांनी पिछाडीवर होता. पण आजच्या सामन्यात तो केवळ 4 धावा करत बाद झाला आणि लाराचा रेकॉर्ड मोडू शकला नाही. लाराने 295 वनडे मॅचमध्ये 10348 धावा केल्या आहेत तर गेलने आजचा सामना मोजून 296 मॅचमध्ये 10342 धावा केल्या आहेत. त्यामुळे लाराचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी गेलला दुसऱ्या वनडे सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. (IND vs WI 1st ODI 2019: मैदानावर मस्तीच्या मूडमध्ये दिसला विराट कोहली, कॅरेबियन गाण्यावर असा केला डान्स, पहा Video)

टी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वनडे मालिकेत विंडिजशी दोन हाथ करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यासाठी  केदार जाधव, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी भारतीय संघात पुनरागमन केले. पण, अजूनही भारतीय संघाला मधल्या फळीसाठीचा सक्षम पर्याय शोधता आलेला नाही. मागील टी-20 मॅचमध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) याने विजयी खेळी केली होती. पण तो अजूनही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, विश्वचषकमध्ये दुखापतीमुळे माघारी परतलेला शिखर धवन पुन्हा वनडेत सलामी करण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे, ख्रिस गेलची ही अखेरची वनडे मालिका असल्या कारणाने विंडीज संघ त्याला एक विजयी सेंडऑफ देण्याच्या निर्धारात असेल. शिवाय गेलकडून वनडेमध्ये अंतिम वेळा स्फोटक फलंदाजी अपेक्षा देखील करत असेल. भारत आणि वेस्ट इंडिज महिला पुढील वनडे सामना क्वीन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये खेळवला जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif