IND vs SA 2nd ODI Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या वेळत बदल, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
मालिकेतील तिसरा सामनाही त्याच वेळी होणार आहे. सेंट जॉर्ज पार्कवर भारत आणि दक्षिण आफ्रिका सहाव्या एकदिवसीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत.
IND vs SA 2nd ODI 2023: पहिला एकदिवसीय सामना 8 गडी राखून जिंकल्यानंतर, टीम इंडिया (Team India) मंगळवारी (19 डिसेंबर 2023) दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) सामना करण्यासाठी सज्ज आहे. हा सामना सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे होणार आहे. दोन्ही संघांमधील ही मालिका एकूण तीन सामन्यांची आहे ज्यात भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वनडे सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होणार नाही. हा सामना किती वाजता सुरू होणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. (हे देखील वाचा: IPL 2024 Auction: आयपीएल 2024 च्या लिलावात 'या' फ्रँचायंझीकडे आहेत सर्वाधिक पैसे, जाणून घ्या कोणत्या संघाचे किती स्लॉट्स आहे रिक्त)
यावेळी होणार सामना सुरू
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होईल. मालिकेतील तिसरा सामनाही त्याच वेळी होणार आहे. सेंट जॉर्ज पार्कवर भारत आणि दक्षिण आफ्रिका सहाव्या एकदिवसीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत. गेल्या पाच सामन्यांपैकी भारताने फक्त एकच सामना जिंकला आहे तर यजमान संघाने चार जिंकले आहेत. या मैदानावर शेवटचा वनडे सामना पाच वर्षांपूर्वी झाला होता. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घ्यायची आहे.
कुठे पाहणार लाइव्ह?
दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना मंगळवार, 19 डिसेंबर 2023 रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघ दुसरा वनडे सामना सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे खेळणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30 वाजता सुरू होईल. तसेच, Disney + Hotstar अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रवाहित केला जाईल. तर, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल.
दोन्ही संघाचे खेळाडू
टीम इंडिया: केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, रजत पाटीदार, साई सुदर्शन, टिळक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि दीपक चहर.
दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर डुसेन, रीझा हेंड्रिक्स, नांद्रे बर्जर, मिहलाली म्पॉन्गवाना, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), काइल वेरेन (विकेटकीपर), ओटनीएल बार्टमन, अँडीले फेहलुक्वायो, शम्सी, केशव महाराज, विआन मुल्डर आणि लिझाद विल्यम्स.