India vs New Zealand 2nd T20I: न्युझीलंड संघावर भारतीय क्रिकेट संघाची 7 विकेट्सने मात, मालिकेत 1-1 अशी बरोबरी

रोहित शर्मा आणि क्रृणाल पांड्या यांच्या दमदार खेळीने भारतीय संघाचा मोठा विजय

Indian Team (Photo Credits: Twitter)

India vs New Zealand 2nd T20I: न्युझिलंड विरूद्ध भारताने पहिला सामना गमावल्यानंतर आज ऑकलंडच्या (Auckland) सामन्यामध्ये भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला होता. रोहित शर्माची(Rohit Sharma)  दमदार खेळी आणि क्रृणाल पांड्याची (Krunal Pandya) ऐतिहासिक कामगिरी भारतीय संघाच्या पथ्यावर पडली आहे. या सामन्यामध्ये भारताने न्युझीलंडवर  7 विकेट्सने  मात केली आहे. India vs New Zealand 2nd T20I: क्रुणाल पांड्या याची चमकदार कामगिरी, 'हा' विक्रम रचणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज!

न्युझीलंडने भारतासमोर 159 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. टॉस जिंकत न्युझीलंड संघ पहिल्यांदा  फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. रोहितने या सामन्यात 29 चेंडूंत तीन  फोर आणि  आणि चार सिक्सर ठोकत  50 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या सामन्यात रोहितने आपल्या षटकारांचे शतक पूर्ण केले आहे. ऋषभ पंत 40 धावांवर नॉटआऊट आहे. 3 सामन्याच्या मालिकेत आता 1-1  अशी बरोबरी झाल्याने पुढील सामना अटीतटीचा असेल.