IND vs IRE Head to Head: टी-20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध आयर्लंड आमनेसामने, आकडेवारीत कोण आहे वरचढ घ्या जाणून
हा सामना रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे संपूर्ण टी-20 विश्वचषक 2024 च्या प्रसारणाचे अधिकार आहेत.
IND vs IRE: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघ बुधवारी (5 जून) न्यूयॉर्कमध्ये टी-20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप ए सामन्यात आयर्लंडशी (IND vs IRE) भिडणार आहे. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. भारत पुन्हा एकदा आयसीसी विजेतेपदाच्या शोधात आहे आणि यावेळी जबाबदारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील अनुभवी संघावर आहे. भारत विरुद्ध आयर्लंड सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे संपूर्ण टी-20 विश्वचषक 2024 च्या प्रसारणाचे अधिकार आहेत. तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर सामना पाहू शकता. त्याच वेळी, डिस्ने + हॉटस्टारवर मोबाईलवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
भारत-आयर्लंड हेड-टू-हेड रेकॉर्ड
भारत आणि आयर्लंड टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 7 वेळा आमनेसामने आले आहेत. मोठी गोष्ट म्हणजे टीम इंडियाने हे सातही सामने जिंकले आहेत. आयर्लंड अजूनही भारताविरुद्धच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. अशा स्थितीत आयरिश संघ या मोठ्या प्रसंगी कोणत्याही किंमतीला विजयाच्या आशेने मैदानात उतरू शकतो. (हे देखील वाचा: IND vs IRE T20 WC 2024 Live Streaming: आज टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना आयर्लंडसोबत, एका क्लिकवर ईथे पाहू शकता लाईव्ह)
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, संजू चहल. शिवम दुबे.
आयर्लंड संघ : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, रॉस अडायर, बॅरी मॅककार्थी, मार्क अडायर, जोशुआ लिटल, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट, नील रॉक , ग्रॅहम ह्यूम.