IND vs IRE T20 WC 2024 Live Streaming: आज टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना आयर्लंडसोबत, एका क्लिकवर ईथे पाहू शकता लाईव्ह

भारत पुन्हा एकदा आयसीसी विजेतेपदाच्या शोधात आहे आणि यावेळी जबाबदारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील अनुभवी संघावर आहे. भारत विरुद्ध आयर्लंड सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

IND vs IRE T20 WC 2024 Live Streaming: आज टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना आयर्लंडसोबत, एका क्लिकवर ईथे पाहू शकता लाईव्ह

IND vs IRE: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघ बुधवारी (5 जून) न्यूयॉर्कमध्ये टी-20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप ए सामन्यात आयर्लंडशी भिडणार आहे. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. भारत पुन्हा एकदा आयसीसी विजेतेपदाच्या शोधात आहे आणि यावेळी जबाबदारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील अनुभवी संघावर आहे. भारत विरुद्ध आयर्लंड सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे संपूर्ण टी-20 विश्वचषक 2024 च्या प्रसारणाचे अधिकार आहेत. तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर सामना पाहू शकता. त्याच वेळी, डिस्ने + हॉटस्टारवर मोबाईलवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 05:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).