India vs England T20I Series 2021: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरचे 3 टी-20 सामने प्रेक्षकांविना; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनचा निर्णय
कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यात कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
भारतात पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus) डोके वर काढल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यात कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England T20I Series 2021) यांच्यातील टी-20 मालिकेतील अखेरचे 3 सामने प्रेक्षकांविना खेळले जाणार आहेत. हे तिन्ही सामने गुजरातच्या (Gujrat) अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) मध्ये पार पडणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढता प्रादुर्भाव पाहता गुजरात क्रिकेट असोसिएशन हा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरचे 3 टी-20 सामने येत्या 16, 18 आणि 20 मार्चला नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये बंद दारामागे म्हणजे प्रेक्षकांविना खेळले जाणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुजरात असोसिएशनने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिन्ही टी-20 सामने बंद दारामागे खेळवण्याची बीसीसीआयकडे विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या प्रेक्षकांनी या सामन्यांचे तिकीट काढले आहेत, त्यांचे पैसे परत केले जाणार आहेत. अशी माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री धनराज नाथवानी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हे देखील वाचा- IND vs ENG 3rd T20I 2021: तिसऱ्या टी-20 सामन्यातून ‘या’ ओपनरचा होऊ शकतो पत्ता कट, पहा टीम इंडियाची संभावित Playing XI
ट्विट-
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाच्या समोरे जावा लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करत भारतीय संघाने इंग्लंडवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला होता. यापुढील 3 सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिका खिश्यात घालणार आहे.