IND vs BAN 1st Test 2022 Live Streaming Online: वनडेनंतर कसोटी मालिकेत भारत विरुद्ध बांगलादेश आमनेसामने, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना
यामध्ये त्याने नऊ विजय मिळवले असून दोन सामने अनिर्णित राहिले. 2015 नंतर भारतीय संघ (Team India) बांगलादेशच्या भूमीवर कसोटी खेळणार आहे.
IND vs BAN: वनडेनंतर कसोटी मालिकेत भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार आहेत. एकदिवसीय मालिकेत 1-2 ने गमावल्यानंतर टीम इंडियाला कसोटीत धमाकेदार सुरुवात करायची आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाची धुरा सांभाळणार आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 11 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने नऊ विजय मिळवले असून दोन सामने अनिर्णित राहिले. 2015 नंतर भारतीय संघ (Team India) बांगलादेशच्या भूमीवर कसोटी खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये सामना झाला आणि तो अनिर्णित राहिला. भारताचा बांगलादेशमध्ये शेवटचा विजय 2010 मध्ये झाला होता. (हे देखील वाचा: Khaleel Ahmed Injury: दुखापतीमुळे खेळाडू खलिल अहमद रणजी हंगामातील सामने गमावणार, भावूक ट्विट करत दिली माहिती)
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?
पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून म्हणजेच बुधवारपासून खेळवला जाणार आहे. तसेच हा सामना चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश सामना कधी सुरू होईल?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.00 वाजता खेळवला जाईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सोनी स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता.
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी पाहणार?
या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव्ह अॅपवर पाहता येईल.