IPL Auction 2025 Live

India vs Bangladesh, CWC 2019: बांगलादेश ला हरवत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये; हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराहचा प्रभावी मारा

याच विजयासह भारताने विश्वकपच्या सेमीफायनल मध्ये आपले स्थान निश्चित केले आहेत.

(Photo Credit: Getty Image)

आयसीसी (ICC) विश्वकपच्या एजबस्टन (Edgbaston) येथील सामन्यात टीम इंडिया (Team India) ने बांग्लादेश (Bangladesh) चा 28 धावांनी पराभव केला. याच विजयासह भारताने विश्वकपच्या सेमीफायनल मध्ये आपले स्थान निश्चित केले आहेत. गुणतक्त्यात टीम इंडिया 13 गुणांसह गत जेट ऑस्ट्रेलिया (Australia) च्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या सेमीफायनलमध्ये प्रवेशाच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. सेमीफाइनलमध्ये प्रवेश करण्यास बांग्लादेशला भारताला पराभूत करणे आवश्यक होते. (ICC World Cup 2019: IND vs BAN मॅचदरम्यान एम एस धोनीला चीअर करताना दिसली लेक जिवा, Video व्हायरल)

दरम्यान, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सलामी जोडी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के. एल राहुल (KL Rahul) यांनी आपल्या आक्रमक केळीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. रोहित-राहुल यांनी शतकी भागीदारी केली. रोहित ने सर्वाधिक 104 धावा केल्या तर राहुल 77 धावा करत बाद झाला. रोहित आणि राहुलनंतर दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही.

दोघे सलामीवीर माघारी परतच रिषभ पंत (Rishabh Pant) आणि विराटयांची चांगली भागिदारी होत असतानाच कोहली पहिल्यांदा अर्धशतक न करता बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भोपळा न फोडताच बाद झाला. त्यानंतर पंतने आक्रमक फलंदाजी करत असतानाच 48 धावांवर बाद झाला. तर धोनी (Dhoni) 34 धावांवर बाद झाला.

दुरीकडे, भारताने दिलेल्या 314 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तमीम इक्बाल (Tamim Iqbal) आणि सौम्या सरकार (Soumya Sarkar) ने संघाला चांगली सुरुवात केली. मात्र, अखेर 10व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमी ने ही जोडी फोडली आणि टीमला पहिली सफलता मिळवून दिली. बांग्लादेशसाठी मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) ने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर भारतासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या ने 10 ओव्हरमध्ये 60 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह ने ही 10 ओव्हरमध्ये 55 धावा देत 4 गडी बाद केले.