IND 174/3 in 46 Overs, (BAN 106 All-Out) | IND vs BAN 2nd Test Day 1 Live Score Updates: कोहली, पुजारा चे अर्धशतक; पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाचा स्कोर 174/3
टीम इंडिया आजपासून बांग्लादेश संघाविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर पहिला पिंक बॉल टेस्ट सामना खेळणार आहे. दोन्ही पहिल्यांदा गुलाबी चेंडूने टेस्ट खेळणार आहे. भारतात प्रथमच ही कसोटी गुलाबी बॉलने खेळली जात आहे.
भारत आणि बांग्लादेशमधील ईडन गार्डन्सवरील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी बांग्लादेशला पहिल्या डावात 106 ऑल आऊट करत भारताने पहिल्या डावात फलंदाजी केली आणि दिवसाखेर 3 गडी गमावून 174 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतक केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट नाबाद 59 आणि अजिंक्य रहाणे नाबाद 23 धावांवर खेळत होते. पुजारा 55 धावांवर कॅच आऊट झाला.
40 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर इबादत हुसेनने चेतेश्वर पुजाराला बाद केले आणि भारताला तिसरा धक्का दिला. दुसर्या स्लिपवर पुजारा शादमान इस्लाम याच्या हाती झेलबाद झाला. पुजाराने 105 चेंडूत 55 धावा केल्या.
पहिले दोन विकेट लवकर गमावल्यावर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. दोंघांनी 87 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला 100 धावांचा टप्पा गाठून दिला. यादरम्यान, पुजाराने 93 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
भारताने बांग्लादेशवे पहिल्या डावात 10 धावांची अगदी मिळवली आहे. यादरम्यान, कोहलीने तैजुल इस्लामचा चेंडू चेंडू मिडऑनच्या दिशेने खेळला आणि एक धाव घेतली. यासह, त्याना कर्णधार म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत. शिवाय, ही कामगिरी करणारा विराट सर्वात जलद कर्णधार बनला आहे. विराटने 53 डावांमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या.
25 वी ओव्हर टाकण्यासाठी तैजुल इस्लाम बॉलिंगसाठी आला आणि त्याच्या षटकांच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीने चौकार मारत पहिल्या डावात भारताच्या 100 धावा पूर्ण केल्या. टीम इंडिया बांग्लादेशच्या पहिल्या डावापासून अवघ्या पाच धावा दूर आहे.
मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांच्या सुरुवातीच्या विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा डाव सावरत आहेत. दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असून असून बांगलादेशच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 18 धावांनी मागे आहे.
टी ब्रेकनंतर भारताला मोठा झटका लागला आहे. इबादत हुसेन ने रोहित शर्मा याला 21 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट करत माघारी धाडले. अंपायरने आऊट दिल्यावर रोहितने दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या पुजारासह चौकशी करत रिव्यू घेतला. पण, थर्ड अंपायरने अंपायर्स कॉलचा निकाल दिला.
टी ब्रेक झाला असून भारताने एका विकेट गमावून 35 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी 44 चेंडूंत नऊ धावांची भागीदारी केली. दुसर्या सत्रात मयंक अग्रवाल याच्या रूपात भारताला एकमेव धक्का बसला.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात मयंक अग्रवाल स्वस्त बाद झाला. त्याने अवघ्या 14 धावा केल्या आणि मेहंदी हसनला अल अमीनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 21 चेंडूंचा सामना केला.
बांग्लादेशला 106 धावांवर ऑल आऊट केल्यावर मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. मयंकने चौकार लगावत भारताचे खाते उघडले. रोहितनेही पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार मारले. दोंघांनी पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा केल्या.
बांग्लादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपुष्टात आला. बांग्लादेशने पहिल्या डावात 30.3 ओव्हरचा सामना केला. भारताकडून इशांत शर्मा याने सर्वाधिक 5, उमेश यादव याने 3 आणि मोहम्मद शमी याने 2 गडी बाद करत बांग्लादेशला बॅकफूटवर टाकले. शमीने अबू जायदला चेतेश्वर पुजाराच्या हाती झेलबाद करत शेवटची विकेट घेतली.
ऐतिहासिक कसोटी सामन्यात इशांत शर्माने आश्चर्यकारक कामगिरी केली. इशांतने नईमला बोल्ड करून बांग्लादेशला 105 धावांवर नऊवा धक्का दिला. इशांतने भारतात 12 वर्षात प्रथमच पाच विकेट घेतले आहेत.
28 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ईशांत शर्माने मेहदी हसनला चेतेश्वर पुजाराच्या हाती झेल बाद करत बांग्लादेशला आठवा धक्का दिला. 100 धावांचा टप्पा गाठण्यापासून बांग्लादेशी संघ दोन धावा दूर आहे.
24 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर इशांतने इबादत हुसेनला बोल्ड करून बांग्लादेशला सातवा झटका दिला. बांग्लादेशने त्यांचे सात गडी 82 धावांवर गमावले आहेत. आता हे पाहावे लागेल की भारतीय गोलंदाज बांग्लादेशी संघाला 100 ची धावसंख्या पूर्ण करू देते की नाही.
लंचनंतरचा खेळ सुरु झाला आहे आणि बांग्लादेशी फलंदाज भारतीय गोलंदाजासमोर संघर्ष करताना दिसताहेत. बांग्लादेशने शंभर धावांच्या आत 6 विकेट गमावल्या आणि आता संघाचे शतक पूर्ण करण्यासाठी इबादत हुसेन आणि नईम हसन झटत आहे.
बांगलादेशला मोठा झटका बसला आहे. मोहम्मद शमीच्या घातक बाऊन्सरमुळे लिटान दास निवृत्त झाला आहे. 21 व्या षटकातील तिसर्या चेंडूवर शमीचा चेंडू लिटनच्या हेल्मेटवर लागला. फिजिओने त्याची तपासणी केली आणि त्यानंतर त्याने खेळण्यास सुरवात केली, परंतु इशांतच्या षटकानंतरच त्याची अस्वस्थता गंभीर झाल्याचे दिसली आणि त्याने हेल्मेट काढून अंपायर विल्सनशी बोलाणी केली. ज्यानंतर तो निवृत्त झाला. याचवेळी अंपायरने लंच ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
कोलकाता टेस्टमध्ये लंचची वेळ झाली आहे. बांग्लादेश संघ अडचणीत आला आहे. संघाने पहिले फलंदाजी करत पहिल्या सत्रात 73 धावांवर 6 गडी गमावले आहेत. टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी संघाचा विजय निश्चित केला आहे.
ईशम शर्माच्या चेंडूएवर महमुदुल्लाने उभे राहून शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटच्या कडेला लागून विकेटकीपर रिद्धिमान साहाकडे गेला. साहाने डाव्या बाजूला उडी मारत उत्तम झेल पकडत भारताला सहावा यश मिळवून दिला.
बर्याच वर्षांच्या संकोचानंतर भारतीय संघ (Indian Team) पिंक बॉलने डे-नाईट टेस्ट सामना खेळण्यास सज्ज आहे. टीम इंडिया आजपासून बांग्लादेश संघाविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर पहिला पिंक बॉल टेस्ट सामना खेळणार आहे. दोन्ही पहिल्यांदा गुलाबी चेंडूने टेस्ट खेळणार आहे. भारतात प्रथमच ही कसोटी गुलाबी बॉलने (Pink Ball) खेळली जात आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा 12 वा डे-नाईट कसोटी सामना असेल. या सामन्यातही कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा वरचष्मा आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवत टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन-स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांदरम्यान खेळलेला सामना ऐतिहासिक ठरणार आहे. पहिला डे-नाईट कसोटी सामना 27 नोव्हेंबर 2015 मध्ये अॅडिलेड ओव्हल मैदानावर न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळला गेला होता. आजवर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, झिम्बाब्वे या 8 देशांनी आतापर्यंत डे-नाईट टेस्ट खेळली आहेत. डिसेंबर 2018 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्यामयंक अग्रवाल याने मागील तीन टेस्ट सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन केले आहेत. त्यामुळे यंदाच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
असा आहे भारत आणि बांग्लादेशचा टेस्ट संघ:
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, कुलदीप यादव आणि उमेश यादव.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)