BAN 152/6 in 32.3 Overs, (IND 347/9dec) | IND vs BAN 2nd Test Day 2 Live Score Updates: टीम इंडियाला विजयासाठी 4 विकेटची गरज, बांग्लादेश अजूनही 89 धावांनी पिछाडीवर

टीम इंडियाने ऐतिहासिक डे-नाईट कसोटीच्या पहिल्या दवशी बांग्लादेशला 106 धावांवर ऑल आऊट केले. आणि नंतर पहिल्या डावात फलंदाजीला येत चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीने पहिल्या दिवसाखेर भारताने 68 धावांची आघाडी घेतली आहे.

24 Nov, 02:07 (IST)

कोलकातामधील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. बांग्लादेशने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 6 विकेट गमावले आहेत. भारताने पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित केल्यावर बांग्लादेशने दुसऱ्या डावात 6 बाद 152 धावा केल्या आहेत. मुश्तफिझूर रहीम नाबाद 59 धावांवर खेळत आहे. 

24 Nov, 02:03 (IST)

33 व्या षटकात उमेश यादवने तिसर्‍या चेंडूवर भारताला सहावे यश मिळवून दिले. उमेशने तैजुल इस्लामला रहाणेच्या हाती झेलबाद केले. तैजुलने 24 चेंडूत 11 धावा केल्या. 

24 Nov, 01:33 (IST)

बांग्लादेशचा अर्धा संघ 133 धावांवर बाद झाला आहे. इशांत शर्मा ने दुसऱ्या डावात बांग्लादेशच्या चार फलंदाजांना बाद केले. फार प्रतीक्षेनंतर भारताला पाचवे यश मिळाले आहे. इशांतने मेहदी हसनला कोहलीच्या हाती झेलबाद केले. महमुदुल्लाहचा कन्सक्शन सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या हसनला केवळ 15 धावा करता आल्या.

24 Nov, 01:30 (IST)

भारतीय गोलंदाजांसमोर मुशफिकुर रहीम याने मालिकेतील दुसरे अर्धशतक केले आहे. ईशांत शर्माच्या चेंडूवर रहीमने अर्धशतक ठोकले असून बांग्लादेश आता दुसऱ्या डावात भारताच्या पहिल्या डावातील 113 धावा मागे आहे.

24 Nov, 24:56 (IST)

महमुदुल्लाह रियाद आणि मुश्तफिझूर रहीम यांच्यात चांगली भागीदारी होत असताना बांग्लादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. महमुदुल्लाहला दुखापतीमुळे माघारी परतावे लागले आहे. महमुदुल्लाहने 39 धावा केल्या होत्या, तर रहीमसह त्याची 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली होती.  बांग्लादेश संघाने 100 धावांचा टप्पा गाठला आहे. दुखापतीमुळे महमूदुल्ला परतल्यानंतर मेहदी हसन रहिमला साथ देत आहे. या दोघांमध्ये 21 धावांची भागीदारी झाली आहे.

24 Nov, 24:38 (IST)

रहीम आणि महमूदुल्ला यांच्यात 50 धावांची भागीदारी झाली आहे. दोघांनीही 48 चेंडूंत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली आणि गडबडीचा डाव किंचित हाताळला. बांग्लादेशच्या पहिल्या चार विकेट ज्या प्रकारे लवकर पडल्या त्या नंतर हा सामना आजच संपेल असे दिसत होते, अखेरच्या 10 षटकांत तीन विकेट गमावल्यावर ही बांग्लादेशी जोडी आपल्या संघाला मुश्किलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. 

23 Nov, 23:46 (IST)

तिसर्‍या दिवशी बांग्लादेशच्या मुश्किलीत वाढ होत चालली आहे. इशांत शर्माने बांग्लादेशला 13 धावांवर चौथा धक्का दिला. सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर इमरूल कायस विराट कोहलीच्या हाती झेल बाद झाला. कायसला फक्त पाच धावा करता आल्या.

23 Nov, 23:39 (IST)

टी ब्रेकनंतर उमेश यादवने दुसर्‍या चेंडूवर भारताला तिसरे यश मिळवून दिले. उमेशने मोहम्मद मिथुनला शमीच्या हाती झेलबाद केले. मिथुनने उमेशच्या शॉर्ट बॉलवर हवेत शॉट खेळला आणि शमीला मिड विकेटवर साधा झेल दिला. मिथुनला फक्त तीन धावा करता आल्या.

23 Nov, 23:19 (IST)

कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा टी-ब्रेक झाला आहे. दुसर्‍या डावात दोन विकेट गमावून बांग्लादेशने 7 धावा केल्या आहेत. आणि सध्या भारताकडे 234 धावांची आघाडी आहे. याआधी इशांत शर्माचा बाउन्सर मोहम्मद मिथुनच्या हेल्मेटला लागला. इशांत आणि कोहली मिथुनकडे आले. फिजिओने मिथुनची तपासणी केली. इशांतचा बाउन्सर हेल्मेटच्या मागे लागला असल्याने याक्षणी सर्व काही ठीक आहे आणि मिथुन फलंदाजी करीत आहे.

23 Nov, 22:57 (IST)

दुसर्‍या ओव्हरमधेही इशांत शर्माचा कहर कायम आहे. आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये शादमान इस्लामला बाद केल्यावर, इशांतने बांग्लादेशी कर्णधार मोमिनुल हक याला विकेटकीपर रिद्दीमान साहाकडे कॅच आऊट केले. मोमिनुलला दुसऱ्या डावातही खाते उघडता आले नाही. 

23 Nov, 22:47 (IST)

दुसऱ्या डावांत फलंदाजीला आलेल्या बांग्लादेशला पहिल्या ओव्हरमधेच मोठा धक्का बसला आहे. इशांत शर्मयाने बांग्लादेशी सलामी फलंदाज शादमान इस्लाम याला एलबीडब्ल्यू आऊट करत बांग्लादेशला पहिला झटका दिला. बांग्लादेशची पहिली विकेट शून्यावर पडली. 

23 Nov, 22:37 (IST)

ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीने मोहम्मद शमी आणि साहाला परत येण्याचे संकेत दिले आहेत. भारताने आपला पहिला डाव नऊ बाद 347 धावांवर घोषित केला आहे. शमी 10 धावा आणि साहा 17 धावांवर नाबाद राहिले. अशाप्रकारे, बांग्लादेशवर भारताकडे 241 धावांची आघाडी मिळाली आहे.

23 Nov, 22:25 (IST)

इशांत शर्मा म्हणून भारताला नववा धक्का बसला आहे. अल अमीनच्या चेंडूवर इशांत एलबीडब्ल्यू बाद झाला. 

23 Nov, 22:16 (IST)

आर. अश्विननंतर उमेश यादवच्या रूपात भारताला 8 वा धक्का बसला. अबू जाएदच्या चेंडूवर उमेश यादवने शादमन इस्लामच्या हाती झेलबाद झाला. 

23 Nov, 22:11 (IST)

आर अश्विनच्या रुपाने भारताला सातवा धक्का बसला आहे. अल-अमीनने अश्विन एलबीडब्ल्यू आऊट केले. अश्विनने 21 चेंडूत नऊ धावा केल्या.

23 Nov, 21:46 (IST)

इबादत हुसेनच्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली तैजुल इस्लामच्या हाती कॅच आऊट झाला. हवेत उडी मारताना तैजुलने आश्चर्यचकित करणारा झेल पकडला. कोहली 194 चेंडूत 136 धावा करुन माघारी परतला.

23 Nov, 21:33 (IST)

लंचनंतर टीम इंडियाचा स्कोर 300 धावांच्या पार पोहचला आहे. टीम इंडियाने बांग्लादेशवर पहिल्या डावात 202 धावांची आघाडी घेतली आहे. 

23 Nov, 21:18 (IST)

लंचनंतर भारताने गमावली पहिली विकेट. अबू जायद ने रवींद्र जडेजा ला केले बोल्ड. जायदच्या चेंडूचा जडेजाला योग्य अंदाज आला नाही आणि चेंडू सरळ स्टंप्सला लागला. 

23 Nov, 20:34 (IST)

बांग्लादेशविरुद्ध कोलकातामधील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या लंचची वेळ झाली आहे. टीम इंडियाने लंचपर्यंत 4 विकेट गमावून 289 धावा केल्या आहेत. यादरम्यान, विराट कोहली याने टेस्ट कारकिर्दीतील 27 वे तर आंतरराष्ट्रीय करिअरमधील 70 वे टेस्ट शतक केले आहे. लंचपर्यंत टीम इंडियाकडे पहिल्या डावांत फलंदाजी करत 183 धावांची आघाडी मिळाली आहे. 

23 Nov, 20:05 (IST)

तैजुल इस्लामच्या ओव्हरमधील तिसर्‍या बॉलवर विराट कोहलीने दोन धावा घेत आपले 27 वे कसोटी शतक पूर्ण केले. डे-नाईट कसोटी सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Read more


इशांत शर्मा (Ishant Sharma) याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक डे-नाईट कसोटीच्या पहिल्या दवशी बांग्लादेशला 106 धावांवर ऑल आऊट केले. आणि नंतर पहिल्या डावात फलंदाजीला येत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  यांच्या अर्धशतकी खेळीने पहिल्या दिवसाखेर भारताने 68 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या दिवशी बांग्लादेश (Bangladesh) वर मजबूत पकड बनवून ठेवली आहे आणि आता दुसऱ्या दिवशी भारतीय संघ (Indian Team) मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या कसोटी सामन्यात तीन दिवसांत डावाच्या फरकाने विजय मिळविणार्‍या भारताने कोलकातामधील पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट गमावून 174 धावा केल्या आहेत. विराट नाबाद 59 आणि अजिंक्य रहाणे नाबाद23 धावांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु करतील. यासह विराट आज त्याचे शतक देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या दिवशी टॉस जिंकून बांग्लादेशचा कर्णधार मोमिनुल हक याने फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्याचे कोणते फलंदाजी तो निर्णय योग्य सिद्ध करू शकले नाही. बांग्लादेशचा पहिला डाव केवळ 30.3 ओव्हरमधेच संपुष्टात आला. त्यांचे फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. लिटन दास याच्याव्यतिरिक्त शादमान इस्लाम याने 29 आणि नईम हसन याने 19 धावा केल्या. भारताकडून 12 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 5 गडी बाद केले. मागील 12 वर्षात पहिल्यांदाच इशांतने भारतात पाच विकेट घेतल्या. उमेश यादव यानेही त्याच्या वेगवान गोलंदाजीने बांग्लादेशी फलंदाजांना खूप त्रास दिला आणि सात ओव्हरमध्ये 29 धावा देऊन तीन गडी बाद केले, तर मोहम्मद शमी याने घातक गोलंदाजी करत 36 धावा देऊन दोन विकेट घेतले. शमीच्या दोन धोकादायक बाऊन्सरने लिटन दासला 24 धावांवर आणि नईम हसनला रिटायर्ड हर्ट होऊन परतावे लागले. त्यांच्या जागी दोन फलंदाजांना कन्सक्शन सबस्टिट्यूट म्हणून बोलावले गेले. भारताच्या डे-नाईट टेस्टची बरीच चर्चा होत होती. आणि सुरुवातीला भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सामन्यावर संघाची पकड आणखी घट्ट केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now