IND 86/1 in 25 Overs | IND vs BAN 1st Test Day 1 Live Score Updates: बांग्लादेश 150 धावांवर ऑल आऊट, पहिल्या दिवसाखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना आज (14 नोव्हेंबर) पासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाईल. टी-20 मालिकेतील पराभवानंतर बांग्लादेशचे संपूर्ण लक्ष टेस्ट मालिका जिंकण्याकडे असेल. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.

14 Nov, 22:40 (IST)

चेतेश्वर पुजारा आज रोहित शर्माप्रमाणे वेगवान फलंदाजी करीत आहे. त्याने 56 चेंडूत 41 धावा केल्या असून त्यात सात चौकारांचा समावेश आहे. दिवसाअखेरीस दोन्ही फलंदाज क्रीजवर नाबाद धावांवर खेळत आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एका विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर बांग्लादेशकडे सध्या 64 धावांची आघाडी आहे. 

14 Nov, 21:18 (IST)

प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेश संघाला 58.3 ओव्हरमध्ये 150 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला आणि त्याने 1 विकेट गमावत 7.2 षटकांत 14 धावा केल्या. रोहित अबू जाएद याच्या चेंडूवर विकेटच्या मागे 6 धावांवर लिटन दासच्या हाती झेलबाद झाला. रोहितने मयंक अग्रवाल यांनी 14 धावांची भागीदारी केली. 

14 Nov, 20:25 (IST)

बांग्लादेशचा कर्णधार मोमिनुल हक याने इंदौर टेस्टमध्ये टॉस जिंकून भारताविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बांग्लादेशचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात आला. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीम याने सर्वाधिक 43 धावा केल्या. टीम इंडियासाठी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. 

14 Nov, 20:05 (IST)

इंडोर टेस्टमध्ये खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात टी ब्रेकनंतर इशांत शर्मा गोलंदाजीची आला. ओव्हरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये इशांतने लिटन दास याला विराट कोहली याच्या हाती झेल बाद करत बांग्लादेशला आठवा धक्का दिला. दासने 21 धावा केल्या. भारताची हॅटट्रिक झाली आहे. तीन चेंडूत तीन विकेट घेतल्या. 

14 Nov, 19:45 (IST)

54 वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद शमीने बांग्लादेशला अखेरच्या दोन चेंडूवर दोन मोठे धक्के दिले. 54 व्या षटकातील पाचव्या बॉलवर मुश्फिकुर रहीमला बोल्ड केले. रहिम 105 चेंडूत 43 धावा करुन परतला. याच्यानंतर अखेरच्या चेंडूवर शमीने मेहदी हसनला शुन्यावर बाद केले. यासह शमी हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. चहाच्या वेळेपर्यंत बांग्लादेश संघाने 54 षटकांत 7 गडी गमावून 140 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात 63 धावा करत तीन विकेट गमावल्यानंतर बांग्लादेशने दुसऱ्या सत्रात चार विकेट गमावल्या.

14 Nov, 19:37 (IST)

आर अश्विनने भारताला पाचवे यश मिळवून दिले. 46 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अश्विनने महमुदुल्लाला बोल्ड केले. महमुदुल्लाह 30 चेंडूत 10 धावा करुन माघारी परतला. या सामन्यात भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे. 

14 Nov, 18:33 (IST)

बांग्लादेश संघाने 37.1 षटकांत 4 गडी गमावून 99 धावा केल्या आहेत. बांग्लादेशला चौथा धक्का देत रविचंद्रन अश्विन याने मोमिनुल हक याला बोल्ड करत माघारी धाडले. मोमिनुलने 37 धावा केल्या. अश्विनने मोमिनुलला बाद करत त्याची आणि मुशफिकुर रहीम यांची भागीदारी मोडली. 

14 Nov, 18:19 (IST)

मुशफिकुर रहीमने क्रीजवर आल्यानंतर बांग्लादेशच्या धावांचा वेग वाढविला आहे. मोमिनुल हकबरोबर त्याने 97 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली आहे. या दोघांची मोठी भागीदारीत संघाला कठीण परिस्थतीतून बाहेर कडू शकते. मुशफिकुर फॉर्ममध्ये दिसत आहे. 34 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मुशफिकुरने एका षटकारासह पुढच्या चेंडूवर चौकार मारला.

14 Nov, 17:12 (IST)

बांग्लादेश संघाने इंदौर कसोटीत टॉस जिंकून भारताविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत बांग्लादेश संघाने दुपारच्या जेवणापर्यंत 26 ओव्हरपर्यंत 3 गडी गमावत 63 धावा केल्या आहेत. मोमीनुल हक नाबाद 22 आणि मुशफिकुर रहीम नाबाद 14 धावांवर खेळत आहे. 

14 Nov, 16:33 (IST)

उमेश यादव आणि इशांत शर्मा यांच्यानंतर तिसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने बांग्लादेशला तिसरा झटका दिला आहे. शमीने मोहम्मद मिथुनला एलबीडब्ल्यू आऊट करत माघारी धाडले. मिथुनने 36 चेंडूत 13 धावा केल्या. यासह बांग्लादेशने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 31 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत. 

14 Nov, 16:15 (IST)

बांग्लादेशचे खेळाडू इंदोरच्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसत आहेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतले आहेत. सध्या कर्णधार मोमीनुल हक आणि मोहम्मद मिथुन यांच्यात 24 चेंडूतकेवळ पाच धावांची भागीदारी झाली. मोमिनुल 4, तर मिथुन 6 धावांवर खेळत आहे. 

14 Nov, 15:37 (IST)

डावाच्या सातव्या ओव्हरमध्ये बांग्लादेशला दुसरा धक्का बसला. कायेसनंतर दुसरा सलामी फ्लान्दाज शादमान इस्लाम बाद झाला. इशांत शर्मा याने इस्लामला यष्टीरक्षक रिद्धिमान साहा याच्या हाती कॅच आऊट केले. शादमानने 6 धावा केल्या. 

14 Nov, 15:32 (IST)

बांग्लादेशच्या डावाची सुरुवात झाली आहे. संघाला सहाव्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. उमेश यादव याने टीम इंडियाला पहिले यश मिळवून देत बांग्लादेशी सलामी फलंदाज इमरूल कायेस याला अजिंक्य रहाणे याच्या हाती झेलबाद केले. कायेस 18 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. 

14 Nov, 15:21 (IST)

टीम इंडियाने टॉस गमावून चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या तीन ओव्हरमध्ये बांग्लादेशला एकही धाव करता आली नाही. उमेश यादव याच्या चौथ्या षटकातील दुसर्‍या चेंडूवर बांग्लादेशचे खाते उघडले. सामन्यानंतर 14 मिनिटांनंतर, कायसने एक धाव केली. 

14 Nov, 14:31 (IST)

भारत आणि बांग्लादेशमधील 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेला आज इंदोरच्या होळकर स्टेडियमवर सुरुवात होत आहे. आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बांग्लादेशचा कर्णधार मोमीनुल हक याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.  दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मागील टेस्ट मॅचमधून टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. शाहबाझ नदीम याच्या जागी इशांत शर्मा याला संघात स्थान मिळाले आहेत. 


भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना आज (14 नोव्हेंबर) पासून इंदोरच्या होळकर स्टेडियम (Holkar Stadium) वर खेळला जाईल. टी-20 मालिकेतील पराभवानंतर बांग्लादेशचे संपूर्ण लक्ष टेस्ट मालिका जिंकण्याकडे असेल. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. मागील पाच सामने जिंकत टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बांग्लादेशचा या मालिकेने प्रवास सुरू होईल. या मालिकेत बांग्लादेशचा संघ तमिम इक्बाल (Tamim Iqbal) आणि शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) यांच्याशिवाय खेळेल. तमिम आणि शाकिबशिवाय बांग्लादेशचा संघ थोडा कमकुवत दिसत आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये यापूर्वी नऊ टेस्ट सामने खेळले आहेत, त्यापैकी सात भारताने जिंकले आहेत, तर दोन पावसामुळे ड्रॉ झाले आहेत. दुसरीकडे, टीम इंडिया बांग्लादेशला हल्ल्यात घेण्याची चूक करणार नाही. बांग्लादेशने टी-20 मालिकेत भारताला चांगले आव्हान दिले होते, त्यामुळे टीम इंडिया बांग्लादेशविरुद्ध पूर्ण तयारीने खेळ करेल.

टीम इंडियाने आजवर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात बांग्लादेशवर वर्चस्व कायम ठेवले आहे. या मालिकेपूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 आणि वेस्ट इंडिजविरूद्ध 2-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती. आणि टीम इंडियाची पुन्हा एकदा क्लीनस्वीपवर नजर असेल. बांग्लादेशविरुद्ध ही मालिका जिंकत भारत टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयाची हॅटट्रिक लगावेल. बांग्लादेशचा सर्वोत्कृष्ट फलंदाज कर्णधार मोमीनुल हक याने कसोटी क्रिकेटमध्ये दहापेक्षा कमी शतकं केली आहेत. मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) आणि महमूदुल्लाह रियाध (Mahmudullah Riadh) हे चांगले क्रिकेटपटू आहेत, पण या स्वरूपात त्यांनी प्रभावी कामगिरी केली नाही आहे. दुसरीकडे, टीम इंडियाची नवी सलामी जोडी मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांच्याकडे पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल.

असा आहे भारत आणि बांग्लादेशचा टेस्ट संघ:

टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, कुलदीप यादव आणि उमेश यादव.

टीम बांग्लादेश: मोमीनुल हक (कॅप्टन), अल-अमीन-हुसेन, इम्रुल कायस, शादमन इस्लाम, सैफ हसन, महमूदुल्ला, मोसद्देक हुसेन, मेहेदी हसन, लिटन दास, मुश्फिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, तैजुल इस्लाम, नईम हसन, मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now