BAN 154/3 in 19.3 Overs (Target 148/6) | IND vs BAN 1st T20I Live Score Updates: बांगलादेशचा टीम इंडियावर 7 विकेट्सने ऐतिहासिक विजय
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणारा पहिला टी-20 सामना लवकरच सुरु होणार आहे. सध्या बांग्लादेशी संघ अरुण जेटली स्टेडियममध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघाने मागील काही दिवसांपासून या मैदानावर प्रदूषणासह सराव केला आहे.
बांग्लादेश संघाने टीम इंडियाविरुद्ध पहिल्या टी-20 मॅचमध्ये 7 विकेटने विजय मिळवला आहे. भारतीय संघाविरुद्ध बांग्लादेशचा टी-20 मधील हा पहिला विजय आहे.मुशफिकुर रहीमयाने संघासाठी सर्वाधिक 60 धावा केल्या.
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल ने बांग्लादेशचा सलामी फलंदाज मोहम्मद नईम याला 26 धावांवर बाद करून टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. नईमने आज आपल्या डावात 28 चेंडूंचा सामना करत 2 चौकार आणि एका षटकारासह 26 धावा केल्या.
बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या पवार-प्लेमध्ये 45 धावा केल्या आहेत. संघासाठी सलामीवीर मोहम्मद नईम 23 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 25 आणि सौम्या सरकार नऊ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 12 धावा खेळत आहे.
टीम इंडियाचे युवा गोलंदाज दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शानदार गोलंदाजीवर बांग्लादेशी फलंदाज संघर्ष करताना दिसताहेत. चार षटकांनंतर एक गडी गमावून संघाची धावसंख्या 20 धावा आहे. संघासाठी सौम्या सरकार 5 चेंडूत 4 धावा आणि मोहम्मद नईम 14 चेंडूत 8 धावा करत खेळत आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने बांगलादेशचा सलामीवीर लिट्टन दासला वैयक्तिक 7 धावांवर बाद करत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. लिटन दासने चार चेंडूंचा सामना करत एक चौकार ठोकला.
भारत आणि बांग्लादेश संघातील पहिल्या मॅचमध्ये निर्धारित 20 ओव्हरमध्ये भारताने बाद धावा केल्या. आणि आता बांग्लादेशला भारतविरुद्ध पहिल्या टी-20 विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य मिळाले आहेत. भारताकडून सलामी फलंदाज शिखर धवन याने सर्वाधिक धावा केल्या. धवनने एकाकी झुंज देत संघाला चांगला स्कोर करून देण्यास महत्वाची भूमिका बजावली.
शिवम दुबे याचा पदार्पण सामान खराब राहिला आणि केवळ एक धावा करत बाद झाला. आफिफ हुसेनचा चेंडू त्याच्या बॅटच्या कड्यावर लागला आणि गोलंदाजाने तो पकडला. चार चेंडूत एक धाव काढून दुबे बाद झाला.
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने 41 धावा केल्या आणि बांगलादेशी विकेटकीपर मुशफिकुर रहीमने त्याला बाद केले. या खेळीत धवनने 42 चेंडूंचा सामना करत तीन चौकार आणि षटकार ठोकले.
टीम इंडियाच्या फलंदाजांचे खराब प्रदर्शन सुरूच आहे. संघाने आता तिसरी विकेटही गमावली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर झेलबाद झाला. श्रेयसने अमीनुल इस्लामच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू जास्त लांब जाऊ शकला नाही आणि मोहम्मद नायब याने बाउंड्री लाईनवर चेंडू पकडला.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारतीय संघाने संथ सुरुवात केली. पहिल्या आठ ओव्हरमध्ये भारताने 2 विकेट गमावले आणि 50 धावा पूर्ण केल्या. शिखर धवन 21 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 19 धावा आणि श्रेयस अय्यर एका षटकाराच्या मदतीने 5 चेंडूत 8 धावा करत खेळत आहे.
पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा याची विकेट गमावल्यानंतर केएल राहुल शिखर धवन याच्या साथीने सावध फलंदाजी करत असताना अमीनुल इस्लाम याने राहुलला बाद करत बांग्लादेशला दुसरे यश मिळवून दिले. राहुलने 15 धावा केल्या.
भारतीय संघाला पहिलीच ओव्हरमध्ये मोठा झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा 9 धावा करत माघारी परतला. शैफुल इस्लाम याने पहिल्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रोहतीला एलबीडब्ल्यू आऊट करत माघारी धाडले. ओव्हरच्या सुरुवातीला रोहितने शानदार सुरुवात करत 2 चौकार ठोकले होते.
आजच्या मॅचमध्ये टॉस जिंकून बांग्लादेश संघाचा कर्णधार महमूदुल्लाह याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघात 2009 पासून 8 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने झाले आहेत. आजच्या मॅचसह अष्टपैलू शिवम दुबे याने भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणारा पहिला टी-20 सामना लवकरच सुरु होणार आहे. यासाठी बांगलादेशचा संघ स्टेडियमवर पोहोचला आहे.
भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणारा पहिला टी-20 सामना लवकरच सुरु होणार आहे. पण, वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) जर दृश्यमानता आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्यास सामना रद्द केला जाऊ शकतो. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. सध्या बांग्लादेशी संघ अरुण जेटली स्टेडियममध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघाने मागील काही दिवसांपासून या मैदानावर प्रदूषणासह सराव केला आहे पण, बंळदेस संघाचे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी मुखवटे परिधान करून सराव करताना दिसले. अशा परिस्थितीत आज मॅच खेळली जाणार की नाही हे लवकरच जाहीर होईल. (पहा भारत-बांग्लादेश संघातील पहिल्या टी-20 मॅचचं Live Score इथे)
2009 पासून या दोन आशियाई देशांमध्ये टी-20 सामने खेळले जात आहेत. भारत आणि बांग्लादेशमध्ये आतापर्यंत एकूण 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारतीय संघाने सर्व जिंकले आहेत. बांग्लादेश संघाला एकही सामन्यात विजय मिळवता आला नाही. त्यामुळे यंदाच्या मालिकेत बांग्लादेशी संधी जुनी समीकरणं बदलण्याच्या प्रयत्नात असतील. असे काही प्रसंग होते जेव्हा बांगलादेश संघ विजयाच्या मार्गावर होता, परंतु भारतीय खेळाडूंनी असे होऊ दिले नाही.
बांग्लादेशविरूद्ध टी-20 मालिकेसाठी भारताची टीमः रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, क्रुणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)