INDW vs AUSW, Women's T20 World Cup Final: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील अंतिम सामन्यात भारताचा पराभव

विश्वचषकातील अंतिम सामन्यात (Women India Women Vs Australia Women) ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघाला 85 धावांनी पराभूत करत विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 (ICC Women’s T20 World Cup 2020) मध्ये सर्वोकृष्ट प्रदर्शन करणाऱ्या भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले आहेत. विश्वचषकातील अंतिम सामन्यात (Women India Women Vs Australia Women) ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघाला 85 धावांनी पराभूत करत विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलामीवीर एलिसा हेली आणि बेथ मूनी या दोघींच्या अर्धशतकाच्या खेळीमुळे 186 धावसंख्या उभी केली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. यामुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारवा लागला आहे. यामुळे भारताने विश्वचषक जिंकावे अशी इच्छा असणाऱ्यांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे.

आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली होती. भारताने याआधी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलचा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र, आयसीसीच्या नियमानुसार भारतीय संघाला अंतिम फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले होते. तसेच दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने दक्षिण आफ्रिका संघावर मात करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर अंतिम सामना पार पडला. यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने चांगली कामगिरी बजावत विश्वचषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात सलामीवीर एलिसा हेली आणि बेथ मूनी या दोघींनी मोलाचा वाटा उचलला आहे. यात सामन्यात बेथ मूनी हिने 54 चेंडूचा सामना करत नाबाद सर्वाधिक 78 धावा ठोकल्या आहेत. यात 10 चौकारांचा समावेश आहे. तर एलिसा हेली हिने 39 चेंडूत 75 धावा केल्या आहेत. यात 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे. 186 धावांचा पाठलाग करत असताना भारताला तिसऱ्याच चेंडूत मोठा धक्का बसला. स्पर्धेत आतापर्यंत तुफानी खेळी करणाऱ्या शेफाली वर्माला दडपणात अपयश आले. मागन स्कटच्या चेंडूवर चिकी फटका मारण्याचा तिचा बेत चुकला आणि यष्टीरक्षक हिलीने सुरेख झेल टिपला. त्यानंतर आलेली तानिया भाटिया रिटारर्ड हर्ट होऊन माघारी परतली. जोमिमा रॉड्रीग्ज शून्यावर बाद झाली आहे. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांनाही जेस जॉनासेनने बाद केले. स्मृती मांधनाचे अपयशाचे सत्र अंतिम सामन्यातही काय राहिले. ती केवळ 11 धावा करून सोफी मोलिनेक्सच्या गोलंदाजीवर बाद झाली. हे देखील वाचा- हार्दिक पांड्याची डीवाय पाटील टी 20 स्पर्धेत वादळी खेळी: 37 चेंडूत झळकावले शतक; पहा व्हिडिओ

आससीसीचे ट्वीट- 

तसेच पूर्वीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. भारतीय संघ अ गटात टॉपवर होता. त्याचाच फायदा भारतीय संघाला झाला होता. भारतासमोर सहा वेळा फायनमध्ये प्रवेश केलेल्या ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान होते. भारताने पहिल्यादांच विश्वचषकात प्रवेश केला होता. तसेच भारतीय महिला संघाने आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 चा किताब जिंकावा, अशी चाहत्यांची इच्छा होती.