India vs Australia: 'या' कारणासाठी Shane Warne याने मागितली भारतीय चाहत्यांची माफी

तर 14 ते 18 डिसेंबर पर्यंत क्रिकेटचे सामने होणार आहेत.

शेन वॉर्न (फोटो सौजन्य-ट्विटर)

India vs Australia: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघाच्या दुसऱ्या कसोटी सामना पर्थच्या मैदानावर सुरु झाला आहे. तर 14 ते 18 डिसेंबर पर्यंत क्रिकेटचे सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपल्या मायभूमीत पहिल्यांदाचा भारताविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये पराभव स्विकारावा लागला होता.मात्र आज होणाऱ्या सामन्या मधून कमबॅक करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे संधी असणार आहे.

ऑस्ट्रलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने (Shane Warne) ट्विटच्या माध्यमातून आजच्या भारताविरुद्धच्या सामन्यासाठी भविष्यवाणी वर्तविली आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाला त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र भारतीय चाहत्यांची माफीसुद्धा मागितली आहे. परंतु माफी मागण्यापाठील कारण हे त्याची कोणतीही चूक नसून त्याने केलेल्या भविष्यवाणीसाठी माफी मागितली आहे. तर शेन वॉर्नच्या मते भारतीय संघाचा पार्थच्या मैदानावर धुव्वा उडेल असे म्हटले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यामध्ये स्टार्कने 5 बळी घेतले होते. तर फिंचने फक्त 11 धावा केल्या होत्या.