India vs Australia 2020-21 Full Schedule: इंडियन क्रिकेट टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा ODI, T20I आणि Test सामन्यांच्या तारखा
या दौऱ्याच्या वेळापत्रकासाठी सर्वच उत्सुक होते. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्याचे वेळापत्रक ऑस्ट्रेलिया बोर्डाकडून रिलीज करण्यात आल्याने क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे.
सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आतुरतने वाट पाहात आहेत. या दौऱ्याच्या वेळापत्रकासाठी सर्वच उत्सुक होते. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्याचे वेळापत्रक ऑस्ट्रेलिया बोर्डाकडून रिलीज करण्यात आल्याने क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे. दोन्ही संघांमधील प्रथम एकदिवसीय सामना (ODI) हा 27 नोव्हेंबर 2020 रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) होणार आहे. तर पहिला टी-20 (T-20) सामना हा मनुका ओव्हल (Manuka, Oval) मैदानावर 4 डिसेंबर 2020 रोजी रंगणार आहे. अॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) मैदानावर डे नाईट टेस्ट क्रिकेट मॅच होणार असून हा सामना 17-21 डिसेंबर दरम्यान होणार आहे. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने घेतली आहे. दरम्यान, क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी देण्याबाबत विचार सुरु आहे. (Rohit Sharma's Twitter Bio: ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या घोषणेनंतर रोहित शर्मा याने ट्विट प्रोफाईलवरून Indian Cricketer हटवले; सोशल मिडियावर चर्चांना उधाण)
कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी सर्व खेळाडूंना बायो सिक्युरिटी प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे. सर्व ऑस्ट्रेलियन आणि भारतीय खेळाडूंची सुरक्षा जपणे ही प्रथम प्राधान्य असेल. तसंच दौरा सुरळीत पार पडावा यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारसह चर्चा करत असल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे सीईओ Nick Hockley यांनी म्हटले आहे. India vs Australia एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ODI वेळापत्रक |
|||
Sr no | तारीख | सामने |
ठिकाण |
1. | नोव्हेंबर 27, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | सिडनी क्रिकेट ग्राऊंड |
2. | नोव्हेंबर 29, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | सिडनी क्रिकेट ग्राऊंड |
3. | डिसेंबर 2, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | मनुका, ओव्हल |
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, T20I वेळापत्रक |
|||
1. |
डिसेंबर 4, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया |
मनुका, ओव्हल |
2. | डिसेंबर 6, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | सिडनी क्रिकेट ग्राऊंड |
3. | डिसेंबर 8, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | सिडनी क्रिकेट ग्राऊंड |
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, Test वेळापत्रक |
|||
1. | डिसेंबर 17-21, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | अॅडिलेड ओव्हल |
2. | डिसेंबर 26-30, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | मेलबर्न क्रिकेट ग्राउंड |
3. | जानेवारी 7-11, 2020 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | सिडनी क्रिकेट ग्राऊंड |
4. | जानेवारी 15-19 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | Gabba |
हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान संघाबाहेर असल्याने देखील या दौऱ्याची सध्या चर्चा आहे. रोहित अनफिट असल्याचे कारण देत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्याऐवजी के.एल राहुल याला व्हाईस कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आले आहे.