India Vs Australia 1st Test: पुजाराचे शतक; पहिल्या दिवशी भारताच्या 250 धावांत 9 बाद

ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 9 विकेट गमावत 250 धावा केल्या आहेत.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

India Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 9 विकेट गमावत 250 धावा केल्या आहेत. एडिले ओवल मैदानावर रंगलेल्या या सामन्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 123 धावांची दमदार खेळी केली. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय संघासाठी सुरुवात खूप वाईट झाली. 100 धावांचा आकडा गाठण्यापूर्वीच भारताचा अर्धा संघ तंबूत परतला.

पुजाराच्या दमदार खेळीसोबतच रोहित शर्माने (Rohit Sharma) 37 आणि ऋषभ पंत (Rishabh Pant)-रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी 25-25 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाच्या वाईट सुरुवातीमुळे हातातून निसटत असलेला डाव चेतेश्वर पुजाराच्या शतकाने सावरला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Women's Ashes 2025: आजपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका खेळवली जाणार, येथे पहा संपूर्ण वेळापत्रक, संघ, सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची माहिती

MLS vs SYS BBL 2024-25 Preview: आज मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात रंगणार रोमांचक सामना, हेड टू हेड, पिच रिपोर्ट, मिनी बॅटल आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती येथे घ्या जाणून

Sri lanka vs Australia Test Series 2025: श्रीलंका विरूद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा; नॅथन मॅकस्विनीचे पुनरागमन, पॅट कमिन्स संघाबाहेर

Melbourne Stars vs Sydney Sixers BBL 2025 Live Streaming: मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Share Now