India Vs Australia 1st Test: तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताची 166 धावांची आघाडी

दुसऱ्या डावात भारताने 151 धावा करत एकूण 166 धावाची आघाडी घेतली आहे.

चेतेश्वर पुजारा-विराट कोहली (Photo Credit: Twitter)

India Vs Australia 1st Test:  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताने (India) दुसऱ्या डावात 3 विकेट गमावत 151 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने (Australia) 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात भारताने 151 धावा करत एकूण 166 धावाची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केल्या 235 धावा; भारताची 15 धावांनी आघाडी

भारताच्या दुसऱ्या डावात के.ए. राहुल आणि मुरली विजय यांनी 63 धावांची भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर मुरली विजय 18 धावांवर तर के.एल. राहुल 44 धावा करुन बाद झाला. हे दोघे तंबूत परतल्यावर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी 71 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला. 34 धावा केल्यानंतर विराट कोहली नॅथन लियॉनच्या चेंडूवर बाद झाला. दिवसाखेरीस चेतेश्वर पुजारा 40 धावा करत नाबाद तर अजिंक्य राहाणे 1 धावा करत नाबाद राहिले आहेत.

चौथ्या दिवशी देखील भारताने अशीच दमदार कामगिरी केल्यास भारताकडे ही कसोटी जिंकण्याची चांगली संधी आहे.