India Tour of England 2022: इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, स्टायलिश अष्टपैलूची मालिकेतून एक्झिट

India Tour of England 2022: 5 जुलैपासून भारताचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. सुरुवातीला दोन्ही संघात गेल्या वर्षी कोविड-19 प्रकरणांमुळे स्थगित झालेली पाचवी कसोटी खेळली जाईल. यावेळी रोहित शर्मा टीम इंडियाचे तर बेन स्टोक्स यजमान इंग्लिश संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो (Photo Credit: PTI)

India Tour of England 2022: इंग्लंडचा (England) कसोटी कर्णधार आणि धाकड अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) उपलब्ध होणार नाही हे जाणून भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडिया (Team India) नक्कीच दिलासा मिळेल. इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पुष्टी केली की स्टोक्स हिवाळ्यापर्यंत केवळ कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल आणि भारत व दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याचा विचार केला जाणार नाही. संघाच्या खराब फॉर्ममुळे जो रूट पायउतार झाल्यानंतर बेन स्टोक्सची अलीकडेच इंग्लंड कसोटी संघाच्या (England Test Team) कर्णधारपदी निवड करण्यात आली. इंग्लंडने गेल्या 17 कसोटी सामन्यांमध्ये फक्त एकच विजय सामना जिंकला आहे, ज्यामुळे संघ आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतक्त्यात तळाशी बसलेला आहे. (Team India: इंग्लंड दौरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; KL Rahul कडे टीमची कमान, Shikhar Dhawan कडे दुर्लक्ष)

“बेन या उन्हाळ्यात व्हाईट बॉल खेळणार नाही. आमची इच्छा आहे की त्याने बाहेर जावे आणि कसोटी कर्णधार व्हावे बनावे कारण ही एक मोठी जबाबदारी आहे. मला या उन्हाळ्यात बेन नको आहे, मला तो नोव्हेंबरमध्ये हवा आहे. तेव्हाच आमची शर्यत सुरू होईल,” इयन मॉर्गनने एका मुलाखतीत डेली मेलला सांगितले. बेन स्टोक्सने ही भूमिका घेतल्याने, इंग्लंडचे कसोटी पुनरुज्जीवन आणि टिकून राहणे या दोन्ही गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतील. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी व्हाईट बॉल मालिकेसाठी तो उपलब्ध होणार नाही. स्टोक्सने अखेरची मर्यादित षटकांची मालिका पाकिस्तानविरुद्ध जुलै 2021 मध्ये खेळली जेव्हा त्याला इंग्लंडच्या शिबिरात कोविडच्या उद्रेकामुळे दुखापतीतून अकाली पुनरागमन करणे भाग होते. याशिवाय स्टोक्सने मार्च 2021 मध्ये भारताविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला. त्यानंतर त्याने आयपीएल 2021 मध्ये फक्त एक सामना खेळला आणि मॅच दरम्यान अंगठ्याच्या दुखापतीमुळे त्याला मायदेशी परतावे लागले होते.

दरम्यान, मॉर्गनने इंग्लंड भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत पूर्ण ताकदीचा संघ उतरवण्याऐवजी संघासह प्रयोग करण्याचेही संकेत दिले. इंग्लंड क्रिकेट संघावर सध्या दुखापतीचे डोंगर कोसळले आहे. वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. तर जोफ्रा आर्चर, ऑली स्टोन, साकिब महमूद, मॅथ्यू फिशर पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहेत. तसेच ख्रिस वोक्स (खांदा, गुडघा) आणि सॅम कुरन (मागेचा ताण फ्रॅक्चर) देखील जखमी आहे. भारताचा इंग्लंड दौरा गेल्या वर्षी स्थगित झालेल्या पाचव्या कसोटीने 1 जुलै रोजी सुरु होईल. यानंतर दोन्ही संघ तीन टी-20 आणि तितक्याच वनडे मालिकेत आमनेसामने येतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now