India Playing XI vs SA 1st Test: भारताच्या प्लेइंग इलेव्हनसाठी 10 खेळाडू आहेत तयार, उर्वरित एका जागेसाठी 2 दावेदार; ‘हे’ असून शकतात संभाव्य 11
सेंच्युरियनच्या मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापन सध्या प्लेइंग इलेव्हनबद्दल संभ्रमात असेल, कारण 10 खेळाडूंना स्वयंचलित प्रवेश मिळणार आहे, तर 1 खेळाडू एका स्थानासाठी दावेदार आहेत.
India Playing XI vs SA 1st Test: यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि पाहुणा भारतीय संघाने (Indian Team) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारीत व्यस्त आहे. 26 डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याने दोन्ही संघ टेस्ट आणि त्यानंतर वनडे मालिकेत एकमेकांशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरतील. सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि भारतीय संघ व्यवस्थापन सध्या प्लेइंग इलेव्हनबद्दल संभ्रमात असेल, कारण 10 खेळाडूंना स्वयंचलित प्रवेश मिळणार आहे, तर तीन खेळाडू एका स्थानासाठी दावेदार आहेत. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे आहे तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व डीन एल्गरकडे असेल. टीम इंडिया आतापर्यंत एकदाही कसोटी मालिका जिंकू शकलेली नाही त्यामुळे यंदा संघ आजवर न कोणत्याही टीम इंडियाला करता आलेले काम करण्याच्या निर्धारित असेल. (IND vs SA 2021-22: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाच्या ‘या’ तीन धुरंधरांच्या कामगिरीवर असणार नजर, टीकाकारांची करू शकतात बोलती बंद)
भारतीय प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलायचे तर केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) सलामीला उतरणे निश्चित आहे. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर असेल, तर कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे फॉर्मशी झगडत असल्यामुळे, श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर प्राधान्य मिळू शकते. तसेच विकेटकीपर रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर असेल तर बॉक्सिंग डे कसोटीत रवी अश्विन एकमेव फिरकीपटू असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्व टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना मैदानात उतरवू शकते. भारतीय संघातील सर्व जवळपास निश्चित झाले असताना सातव्या क्रमांकावर अजूनही शंका आहे. या जागेसाठी दोन खेळाडू आहेत, त्यापैकी एक जलद गोलंदाजी अष्टपैलू आणि एक फलंदाजी अष्टपैलू आहे. सातव्या क्रमांकावर वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि फलंदाजी अष्टपैलू हनुमा विहारी आहे. ओव्हर-रेट लक्षात घेता संघ हनुमा विहारीला प्राधान्य देईल, जो कमी धावसंख्येपासून काही षटके खेळू शकतो. शार्दुल देखील ही जागा भरू शकतो, जो फलंदाजी तसेच गोलंदाजीत योगदान देऊ शकतो.
बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताची संभाव्य इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवी अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.