धोनीची अफलातून कॅच ; निवड समितीला चोख उत्तर (Video)
पण हा अफलातून कॅच पकडत धोनीने निवड समितीला चोख उत्तर दिले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि कूल कॅप्टन म्हणून ओळखला जाणार महेंद्रसिंग धोनीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात एक अफलातून कॅच पकडला. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्धच्या टी- 20 संघातून महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले आहे. पण हा अफलातून कॅच पकडत धोनीने निवड समितीला चोख उत्तर दिले आहे. वयाच्या 37 वर्षी देखील तरीही आपण किती फिट आहोत, हे धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले.
कूल कॅप्टन धोनी कधीही कोणत्याही निर्णयावर आपली प्रतिक्रीया देत नाही. टी-20 मधून वगळण्यात आल्यावरही धोनी शांतच राहिला. आपल्या कामातून बोलणाऱ्या धोनीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात एक कडक कॅच पकडला आणि सलामीवीर हेमराजला माघारी धाडले. धोनीला टी-20 मधून वगळण्यात आल्याने टी-20 धोनीची कारकिर्द संपुष्टात येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.