IND-W vs SA-W 1st ODI: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने मिळवला सहज विजय
पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 2 विकेट गमावत लक्ष्य गाठले.
दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये भारतीय महिला संघाने (India Women's Cricket Team) 9 विकेट्स राखत सहज विजय मिळवला. पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 2 विकेट गमावत लक्ष्य गाठले. प्रिया पुनिया (Priya Punia) आणि कर्णधार मिताली राज (Mithali Raj) यांनी संघाला विजय मिळवून दिला. आफ्रिकाविरुद्ध आजचा सामना प्रियाचा वनडेमधील पदार्पणाचा सामना होता. आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय वनडे मॅचमध्ये प्रियाने नाबाद 74 धावा केल्या. टीम इंडियासाठी जेमीमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) आणि प्रियाने उपयुक्त सुरुवात केली. जेमीमाह अर्धशतक पूर्ण करत 55 धावांवर बाद झाली. त्यांनतर पुनम राऊत (Punam Raut) 14 धावांवर बाद झाली. मिताली 11 धावांवर नाबाद राहिली. भारतासाठी जेमिमाह आणि प्रियाने शानदार सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी मोठे आक्रमक शॉट खेळणे सुरु ठेवले.
या मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले होते. लिझेल ली संघाच्या फलंदाजीत काही खास योगदान देऊ शकली नाही आणि शून्यावर बाद झाली. त्यानंतर लॉरा वोल्वार्ड हिने त्रिशा चेट्टीच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, भारतीय गोलंदाज त्याच्या वरचढ राहिले. आणि चेट्टी 14 धावांवर बाद झाली. मैरीजाने कैप ने आफ्रिकेसाठी अर्धशतकी खेळी केली. कैप 54 धावा करून माघारी परतली. भारताकडून झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) ने सर्वाधिक 3 गडी बाद केले, शिखा पांडे (Shikha Pandey) , पूनम यादव (Poonam Yadav) आणि एकता बिष्ट (Ekta Bisht) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) ला एक विकेट मिळाली.
दोन्ही संघातील दुसरा वनडे सामना 11 ऑक्टोबरला वडोदराच्या रिलायन्स क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. यापूर्वी, भारताने टी-20 मालिका 3-1 ने जिंकली होती. यंदाच्या वनडे मालिकेसाठी, भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला होता. स्मृती मंधाना ला पायाच्या फ्रॅक्चरमुळे मालिकेला मुकावे लागले आहे. तिच्या जागी पूजा वस्त्रकर ची संघात वर्णी लागली आहे.