IND W vs ENG W Test Live Streaming: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड महिला आमनेसामने, ब्रिस्टल टेस्ट सामना लाईव्ह कधी कुठे आणि केव्हा पाहता येणार?

सात वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. Sony Ten 1 भारतात सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करेल तर Sony Liv. Jio TV आणि Airtel XStream वर चाहते सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI Women)

IND W vs ENG W Test Live Streaming: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला आज ब्रिस्टल येथे सुरुवात होणार आहे. सात वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघ (Indian Team) कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. 22 वर्षांच्या कारकिर्दीत फक्त 11 व्या कसोटी सामन्यासाठी अनुभवी कर्णधार म्हणून मिताली राज (Mithali Raj) युवा संघाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय चाहत्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी महिला संघाच्या कसोटी सामन्याचा आनंद लुटला येणार आहे. कसोटी सामना बुधवारी, 16 जूनपासून ब्रिस्टलच्या (Bristol) काउंटी मैदानावर खेळला जाईल. चार दिवसांचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. Sony Ten 1 भारतात सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करेल तर Sony Liv. Jio TV आणि Airtel XStream वर चाहते सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. (IND W vs ENG W One-Off Test: ब्रिस्टल कसोटीत कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, कोण बनणार मॅच-विनर?)

भारत आणि ब्रिटनमध्ये अनेक क्वारंटाईन नंतर राजच्या नेतृत्वातील संघाला नोव्हेंबर 2014 पासून पहिल्या रेड बॉल सामन्याच्या तयारीसाठी आठवड्याभराचा थोडा वेळ मिळाला. मिताली सध्याच्या सात खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध म्हैसूर कसोटी सामन्यात विजय मिळवला. तथापि, भारत महिला संघाने खेळलेल्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यात सर्व सामने जिंकले आहेत ज्यामध्ये इंग्लंड महिलाविरुध्द दोन (2006, 2014), आणि एक दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध (2014) मालिकेचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताविरुद्ध इंग्लंड महिला संघ मायदेशात एकही कसोटी सामना जिंकू शकलेले नाही.

पाहा इंग्लंड महिला आणि भारत महिला कसोटी संघ

भारतः मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पुनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमीमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (विकेटकीपर), इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव.

इंग्लंड: हेदर नाइट (कर्णधार), एमिली अरलोट, टॅमी ब्यूमॉन्ट, कॅथरीन ब्रंट, केट क्रॉस, फ्रीया डेविस, सोफिया डन्कले, सोफी इक्लेस्टोन, जॉर्जिया एल्विस, तॅश फरॅरंट, सारा ग्लेन, अ‍ॅमी जोन्स, नॅट सायव्हर (उपकर्णधार), अन्या श्रुबसोल, मॅडी विलियर्स, फ्रॅन विल्सन, लॉरेन विनफिल्ड-हिल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif