IND W vs ENG W Test 2021: शेफाली वर्मा, स्नेह राणा यांची ऐतिहासिक कामगिरी, भारत-इंग्लंड कसोटी सामना ड्रॉ
शेफाली वर्मा आणि स्नेह राणा यांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर टीम इंडिया सामना अनिर्णित करण्यात यशस्वी ठरली. राणाने 80 धावांची निर्णायक नाबाद खेळी केली तर शेफालीने दुसऱ्या डावात 63 दहावीची विक्रमी कामगिरी बजावली.
IND W vs ENG W Test 2021: इंग्लंडच्या (England) ब्रिस्टल काऊंटी मैदानावर (Bristol County Ground) खेळल्या गेलेल्या इंग्लडने आणि भारत महिला (India Women) संघातील एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर टीम इंडिया सामना अनिर्णित करण्यात यशस्वी ठरली. राणाने 80 धावांची निर्णायक नाबाद खेळी केली तर शेफालीने दुसऱ्या डावात 63 दहावीची विक्रमी कामगिरी बजावली. पदार्पणातील कसोटी सामन्यात चार विकेट्स घेवून फावत 50 पेक्षा जास्त धावा करणारी राणा ही भारताचा पहिली खेळाडू ठरली आहे. तसेच, ही कामगिरी करणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे. ब्रिस्टल मैदानात फॉलोऑन खेळणाऱ्या मिताली राजच्या भारतीय संघाने चौथ्या दिवसाखेर 344 धावांवर 8 विकेट गमावल्या व सामना ड्रॉ केला. विशेष म्हणजे यामुळे, ब्रिटिश संघाची मायदेशात भारताविरुद्ध कसोटी जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर गेली आहे. (IND W vs ENG W Test 2021: शेफाली वर्माची कसोटी पदार्पणात धमाल, ‘हा’ कारनामा करणारी बनली पहिली महिला क्रिकेटपटू)
सामन्यात यजमान इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली. टॅमी ब्यूमॉन्ट, कर्णधार हेदर नाइट आणि पदार्पणवीर सोफिया डन्कली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ब्रिटिश संघाने 396/9 धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. त्यांनतर भारताकडून शेफाली आणि स्मृती मंधानाच्या सलामी जोडीने टीमला जोरदार सुरुवात करून दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 167 धावांची विक्रमी शतकी भागीदारी झाली. यादरम्यान 17-वर्षीय शेफालीने पदार्पणात पहिले अर्धशतक ठोकले पण फक्त चार धावांनी तिचे शतक हुकले. स्मृतीने पहिल्या डावात 78 धावांची खेळी केली मात्र दुसऱ्या डावात प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरली. शिवाय कर्णधार मिताली आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर देखील फ्लॉप ठरल्या परिणामी संघ 231 धावांवर ऑलआऊट झाला आणि यजमान संघाने फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले.
दुसरीकडे, दुसऱ्या डावात फलंदाजी करत शेफालीने पुन्हा एकदा अर्धशतक ठोकले आणि 63 धावा केल्या. शिवाय दीप्ती शर्माने 54, पूनम राऊतने 39 आणि तानिया भाटियाने 44 धावांची महत्वपूर्ण नाबाद केली केली. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात सोफी इक्लेस्टोन यशस्वी गोलंदाज ठरली. तिने सर्वाधिक 4 भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. आता कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येतील.