IND W vs ENG W Test 2021: 17 वर्षीय Shafali Verma हा कमाल करणारी बनली पहिली भारतीय महिला, इंग्लंड विरोधात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
भारतीय महिला संघाच्या या स्फोटक फलंदाजाने 63 चेंडूत आपले दुसरे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारी ती भारताची पहिली तर जगातील चौथी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
IND W vs ENG W Test 2021: इंग्लंड महिला (England Women) संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात भारताची (India) 17 वर्षीय सलामी फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) अर्धशतकी खेळी केली आहे. भारतीय महिला संघाच्या या स्फोटक फलंदाजाने 63 चेंडूत आपले दुसरे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान शेफाली वर्माने 10 चौकार ठोकले. तिने यापूर्वी पहिल्या डावात 96 धावांची तुफान खेळी केली होती आणि आता शेफालीने दुसऱ्या डावातही अर्धशतक ठोकून इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारी ती भारताची पहिली तर जगातील चौथी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तसेच शेफाली कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावणारी सर्वात युवा महिला क्रिकेटपटू ठरली आहे. शेफालीने वयाच्या 17 वर्ष आणि 139 दिवसांत ही कमाल केली आहे. (IND W vs ENG W Test 2021 Day 3: स्मृती-शेफालीची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी व्यर्थ, टीम इंडिया पहिल्या डावात 231 धावांवर ढेर; इंग्लंडने दिला फॉलोऑन)
यापूर्वी, इंग्लंडच्या पहिल्या डावातील 396/9 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या शेफालीने 96 धावांची कामगिरी केली पण मोठा फक्त खेळून जादुई शंभरी धावसंख्या पार करण्याच्या प्रयत्नात तिचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. पहिल्या डावात शेफालीने तिची वरिष्ठ जोडीदार स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) साथीने पहिल्या विकेटसाठी 167 धावांची विक्रमी भागीदारी करत संघाला शानदार सुरुवात करून दिली होती. शेफाली-स्मृतीची सलामी जोडी तुटल्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ 231 धावांवर ऑलआऊट झाला व हेदर नाइटच्या ब्रिटिश संघाने टीम इंडियाला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले. फॉलोऑन खेळण्यासाठी शेफालीने पुन्हा एकदा स्मृतीसोबत डावाची सुरुवात केली पण खराब शॉट खेळून अनुभवी फलंदाज पॅव्हिलियनमध्ये परतली. त्यानंतर पावसाने व्यत्यय आणला तेव्हा वर्माने दुसर्या विकेटसाठी दीप्ती शर्मासह सलामीवीरने महत्त्वपूर्ण नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.
दुसरीकडे, भारताकडून सर्वात कमी वयात कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतकी खेळीचा रेकॉर्ड मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 1990 मध्ये इंग्लंड विरोधात 17 वर्ष आणि 107 दिवसात दोन्ही डावात अर्धशतक ठोकले होते तर शेफालीने 17 वर्ष आणि 139 दिवसात हा कारनामा केला आहे.