IND W vs ENG W Test 2021 Day 2: स्मृती मांधना आणि शेफाली वर्माची जबरदस्त फलंदाजी, पण दिवसाअखेर इंग्लंडच्या गोलंदाजाची दिसली जादू
भारताने दिवसाअखेर 5 बाद 167 धावा केल्या आहेत.
भारतीय महिला संघ आणि इग्लंड महिला संघ (IND W vs ENG W) यांच्यात काऊंटी ग्राऊड (Bristol County Ground) येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दिवसाअखेर 5 बाद 167 धावा केल्या आहेत. फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्मृती मांधना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्माने (Shafali Verma) 161 धावांची भागिदारी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, दिवसाअखेर इग्लंडच्या गोलंदाजीने जबरदस्त कामगिरी करत पुनारागमन केले. अखेरच्या 10 ओव्हरमध्ये भारतीय संघाने 16 धावा करत तब्बल 5 विकेट्स गमावले आहेत.
भारताकडून खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्मृती मांधनाने 155 चेंडूत 14 चौकारच्या मदतीने 78 धावा केल्या. तर आपल्या डेब्यू मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करून 17 वर्षीय शेफाली वर्माने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेफालीने 152 चेंडूत 96 धावा ठोकल्या. यात 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. पंरतु, केट क्रॉसच्या गोलंदाजीवर ती बाद झाली आणि तिची 4 धावांनी शतक हुकले. त्यांनतर स्मृती मांधना आऊट झाल्यानंतर भारतीय संघ ढासळला. पूनम राऊत (2), शिखा पांडे (0) आणि मिथाली राज (2) पाठोपाठ आऊट झाले. हे देखील वाचा- ENG Vs IND: भारतीय फलंदाज शेफाली वर्माची जबरदस्त कामगिरी, इग्लंड विरुद्ध डेब्यू मॅचमध्ये ठोकले अर्धशतक
ट्वीट-
इग्लंडच्या संघाकडून कर्णधार हीथ नाइटने 2 विकेट पटकावल्या आहेत. तर, सोफी इक्लेस्टोन, केट क्रॉस आणि नताली सायव्हर या तिघींना प्रत्येकी 1 विकेट्स मिळाली आहे. सध्या हरमनप्रीत कौर (4) आणि दीप्ती शर्मा (0) फलंदाजी करत आहे. यामुळे तिसऱ्या दिवशीच्या खेळात कोणाचे परडे जड असेल? हे पाहणे अतिशय महत्वाचे ठऱणार आहे.