Mithali Raj Record, IND W vs ENG W: मिथाली राज हिचा धावांचा डोंगर रचत विश्वविक्रम; भारतीय महिला क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तूरा
तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. पाठिमागील दोन आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची 22 वर्षे पूर्ण करणारी मिताली महिला श्रेणीच्या तीन्ही फॉर्मेटमध्ये सर्वसाधारण सर्वात अधिक धावा ठोकणारी खेळाडू ठरली आहे.
'म्हारी छोरियां छोरो से कम है के' हे उद्गार आजच्या बदलत्या युगात आजही कमी उच्चारले जात असले तरी, जेव्हा उच्चारले जातात तेव्हा ती वेळ ऐतिहासिकच ठरते. भारतीय महिला क्रिकेटपटू मिथाली राज (Mithali Raj) हिच्याबाबतीत असेच घडले आहे. मिथाली राज हिने विश्वविक्रम (Mithali Raj Record) करत जागतिक महिला क्रिकेटमध्ये स्वात:सोबतच भारताचे नाव अत्युच्च स्थानि नेऊन ठेवले आहे. भारतीय महिला आणि इंग्लंड महिला एकदिवसीय क्रिकेट (India Women vs England Women ODI Series) सामन्यांच्य मालिकेत मिथालीने धावांचा चक्क विश्वविक्रम केला आहे. तिच्या विश्वविक्रमामुळे ती जगातील सर्वाधिक धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.तिने इंग्लंडच्या Charlotte Edwards हिला पाठिमागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला. शनिवारी (3 जुलै) इंग्लंडसोबत (IND W vs ENG W) झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या तिसऱ्या दिवशी तिने ही कामगिरी केली. ( हेही वाचा, Mithali Raj हिची ऐतिहासिक कामगिरी, Sachin Tendulkar यांच्यानंतर असा कारनामा करणारी ठरली दुसरी खेळाडू)
मिथाली राज हिची क्रिकेट कारकीर्दही दमदार राहिली आहे. तिने आतापर्यंत 11 टेस्ट सामन्यांमध्ये 1क शतक आणि 4 अर्धशतकं ठोकली आहेत. या शतकांच्या जोरावर तिने 669 धावा ठोकल्या आहेत. तर 89 टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17 अर्धशतके ठोकत 2364 धावा ठोकल्या आहेत. पुढे तिने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतून निवृत्ती घेतली. या सामन्यापूर्वी तिने 216 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7229 धावा ठोकल्या आहेत. 7 शतकं आणि 57 अर्धशतंकही तिच्या नावावर आहेत. या सर्वांच्या सहाय्याने तिच्या नावावर 10,262 धावा होत्या.
बीसीसीआय ट्विट
दरम्यान, मिथाली राज हिची विक्रमातील प्रतिस्पर्धी राहिलेली शार्लोट एडवर्डस हिने 309 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13 शतके आणि 67 अर्धशतकं ठोकली आहेत. या शतकांच्या सहाय्याने तिने 10273 धावा नोंदल्या आहेत. त्याच पद्धतीने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शार्लोट हिला पाठिमागे टाकण्यासाठी मिथाली हिस केवळ 12 धावांची आवश्यकता होती. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळी करत तिने शार्लोटचा विक्रम मोडून तो आपल्या नावावर केला. त्यामुळे आता सर्व फॉर्मेटमध्ये मिळून मिथाली च्या नावावर 317 सामने आणि 10,278 धावा झाल्या आहेत. वृत्त लिहित असताना सामना सुरु होता आणि मिथाली मैदानावर होती.