IND (W) vs ENG (W) 1st Test Day 1: कर्णधार हीथर नाईट आणि टॅमी ब्युमॉन्टची अर्धशतकीय खेळी, इंग्लंडच्या पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 269 धावा
भारतीय महिला संघ आणि इग्लंड महिला संघ यांच्यात काऊंटी ग्राऊड येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. कर्णधार हीथर नाईट (95) आणि टॅमी ब्युमॉन्ट यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवसाअखेर 6 बाद 269 धावा केल्या आहेत. सोफीया डंकलीस (47) आणि कॅथरिन ब्रन्ट (7) मैदानात असताना खेळ थाबवण्यात आला आहे. भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केलेल्या स्नेह राणा हिने 3 विकेट घेतले आहेत. तर, दीप्ती शर्माने 2 आणि पूजा वस्त्राकर हिने 1 विकेट घेतला आहे. या सामन्यात इग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लॉरेन विन्फिल्ड हिल आणि ब्युमॉन्टने इंग्लंडच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 69 धावांची भागेदारी केली. ही भागिदारी मोठी होण्याआधी वस्त्राकरने विन्फिल्डचा विकेट घेऊन इंग्लंडला पहिला झटका दिला. या सामन्यात विन्फिल्ड 63 चेंडूवर 4 चौकार आणि 2 षटकारच्या मदतीने 35 धावा केल्या आहेत.
इग्लंडच्या संघाने लंच ब्रेकपर्यंत 1 विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. तर, दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या संघाने चांगली कामगिरी केली. ब्युमॉन्टने नाईट हिच्यासोबत 71 धावांची भागिदारी केली. दरम्यान, स्नेहने ब्युमॉन्टला आऊट करून तिची इनिंग संपवली. ब्युमॉन्टने 144 चेंडूत 6 चौकारच्या मदतीने 66 धावा केल्या आहेत. त्यांनंतर तिसऱ्या डावात नाईटने नताली स्कायवर सोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली. त्यानंतर दीप्तीने स्कायवरला (42) आऊट करून इंग्लंडच्या संघाला तिसरा झटका दिला. हे देखील वाचा- ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत Steve Smith पुन्हा बनला नंबर-1 फलंदाज, जाणून घ्या केन विल्यमसन-विराट कोहली यांची रँकिंग
यानंतर थोड्याच वेळात स्नेहने यष्टिरक्षक फलंदाज अॅमीलन जोन्सला (1) बाद केले. शतकाच्या दिशेने जाताना दीप्तीने नाइटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नाईटने 175 चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या. नाइट पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर स्नेहने जॉयस्या एल्व्हिसला (5) बाद केले. ज्यामुळे इंग्लंडच्या संघाने दिवसाअखेर 6 बाद 269 धावा केल्या आहेत.