IPL Auction 2025 Live

IND W vs AUS W Test: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर 8 विकेटनी शानदार विजय

टीम इंडियाने कांगारूंचा तब्बल आठ गडी राखून धुव्वा उडवला आहे.

IND W vs AUS W Test

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरू असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केला आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी आठ गडी राखून हा विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय महिला संघाने 406 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर फॉलनंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 261 धावा केल्या. यामुळे भारताला 75 धावांचे लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. (हेही वाचा - IND W vs AUS W 1st Test: हरमनप्रीत कौर आणि एलिसा हिली यांच्यात जोरदार वाद, पाहा व्हिडिओ)

पाहा व्हिडिओ -

स्मृती मानधनाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. रिचा अंजनाने 13 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 12 धावांवर नाबाद राहिली. शफाली वर्माला केवळ 4 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि अ‍ॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला पहिला विजय मिळाला आहे.