IND vs ZIM: झिम्बाब्वेमध्ये 'हे' 3 खेळाडू करू शकतात अप्रतिम कामगिरी, संघ झिम्बाब्वेला रवाना
या मालिकेत सर्वांच्या नजरा दिपक हुडा, (Deepak Hooda) केएल राहुल (KL Rahul) आणि आवेश खान (Avesh Khan) यांच्यावर असतील. कारण, सर्वांना झिम्बाब्वेविरुद्ध चांगले खेळून आशिया चषकातील टॉप 11 मध्ये स्थान मिळवायचे आहे.
आशिया चषक (Asia Cup 2022) आणि T20 विश्वचषकाच्या (T20 Worldcup 2022) आधी, भारतीय संघ (Team India) झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध 3 एकदिवसीय (ODI) सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेला रवाना झाला असून, काळजीवाहू प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman), केएल राहुल (KL Rahul) या संघाचे नेतृत्व करत आहेत, जो नुकताच दुखापतीतून सावरला आहे. या आधी झिम्बाब्वे दौर्यासाठी शिखर धवनला (Shikhar Dhawan) कर्णधार करण्यात आला होते. जो अचानक बदलून केएल राहुलला संघाचे कर्णधार देण्यात आले. या मालिकेत सर्वांच्या नजरा दिपक हुडा, (Deepak Hooda) केएल राहुल (KL Rahul) आणि आवेश खान (Avesh Khan) यांच्यावर असतील. कारण, सर्वांना झिम्बाब्वेविरुद्ध चांगले खेळून आशिया चषकातील टॉप 11 मध्ये स्थान मिळवायचे आहे.
केएल राहुलकडून अपेक्षा
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात केएल राहुल, दीपक हुडा आणि आवेश खान यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये केएल राहुल नुकताच दुखापतीतून बाहेर आला आहे, प्रत्येकजण त्याच्याकडून एका चांगल्या कर्णधारासह डावाला चांगली सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे, केएल राहुलच्या फंलदाजीचा अनुभव आपन सगळे जाणून आहोत, दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर केएल राहुल धमाकेदार पुनरागमन करेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे.
दीपक हुडाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा हा अतिशय लोकप्रिय खेळाडू आहे, जेव्हापासून हुड्डा संघात आला आहे, तेव्हापासून आश्चर्यकारक कामगिरी केली जात आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध शतक झळकावून आपली प्रतिभा दाखवून दिली होती, हा दिग्गज खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि प्रत्येक वेळी तो कर्णधाराच्या आत्मविश्वासावर उभा आहे, मग तो गोलंदाजी असो किंवा फलंदाज, हा खेळाडू सर्वत्र फिट बसतो. बॉल किंवा बॅट किंवा दोन्हीने खेळ फिरवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. (हे देखील वाचा: टीम इंडियात पुन्हा दिसणार धोनीचा जलवा, आशिया चषक आणि T20 विश्वचषकासाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती)
आवेश खान होवू शकतो गेम चेंजर
आवेश खान हा एक उत्तम खेळाडू आहे ज्याने आयपीएलमध्ये आपल्या खेळाने करोडोंची मने जिंकली पण भारतीय संघासाठी तो काही विशेष करू शकला नाही, त्याच्यामध्ये नियमितपणा दिसत नाही. यातून उदयास येऊन गेम चेंजर व्हायला आवडेल. आशिया चषकापूर्वी त्याचा फॉर्म नियमित करून गेल्या काही मालिकांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट चिंतेचा विषय ठरला आहे. या तिघांशिवाय इशान किशन, ऋतुराज गायकवाड, प्रसिध्द कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शिखर धवन, सुभमन गिल, राहुल त्रिपाठी, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, दीपक चहर हे सर्वजण आपले सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न करतील, आणि मालिका जिंकून येतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)