IND vs WI 3rd T20I: टी-20 मध्येही टीम इंडिया अपराजित; वेस्ट इंडिज संघाचा रोहित ब्रिगेडने केला ‘डबल क्लीन स्वीप’, शार्दूल ठाकूरने पालटला सामना
वेस्ट इंडिज विरोधात तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाहुण्या संघावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आणि बॉलने दमदार कामगिरी करून धावांनी जोरदार विजय मिळवला. विंडीजसाठी निकोलस पूरनने 61 धावांची झुंजार खेळी केली. पूरन एकहाती संघाला विजय मिळवून देईल असत वाट असताना शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून बाद होताच सामन्याचे चित्र बदलले.
IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिज (West Indies) विरोधात कोलकाता येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील टीम इंडियाने (Team India) पाहुण्या संघावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आणि बॉलने दमदार कामगिरी करून 17 धावांनी जोरदार विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करून दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीज संघ निर्धारित 20 षटकांत 167/9 धावाच करू शकला. परिणामी संघाला एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 मालिकेत देखील क्लीन स्वीप पत्करावा लागला. यासह एकदिवसीय मालिकेनंतर एका संघाविरुद्ध टी-20 मालिकेत अजेय असा विजय भारतीय संघाने मिळवला आहे. विंडीजसाठी निकोलस पूरन (Nicholas Pooran) एकटा लढला आणि 61 धावांची झुंजार खेळी केली. मोक्याच्या क्षणी पूरन एकहाती संघाला विजय मिळवून देईल असत वाट असताना शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून बाद होताच सामन्याचे चित्र बदलले. (IND vs WI 3rd T20I: एका ओव्हरमध्ये दोन DRS; रोहितने अंपायरची चूक पुन्हा सिद्ध केली, नेटकरी म्हणाले - ‘डायनॅमिक Rohit Sharma’)
विंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 बद्दल बोलायचे तर फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल आणि दीपक चाहर रोहित ब्रिगेडच्या विजयाचे नायक ठरले. भारताकडून हर्षलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर दीपक चाहर, शार्दूल ठाकूरआणि वेंकटेश अय्यर यांनी दोन गडी बाद केले. सामन्याच्या सुरुवातीला झटपट विकेट गमावलेला संघ अडचणीत असताना सूर्यकुमार आणि वेंकटेशने 91 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. सूर्यकुमार यादवने यादरम्यान 31 चेंडू खेळून 65 धावा ठोकल्या. तर अष्टपैलू अय्यरने 35 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय ईशान किशनने 34 धावांचे योगदान दिले. यापूर्वीच तीन सामन्यांची मालिका खिशात घेतल्याने यजमान संघ चार बदलांसह मैदानात उतरला होता. त्यापैकी एक म्हणजे कर्णधार रोहित शर्माने आपल्या सलामीच्या जागेचा त्याग करून युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला किशन सोबत सलामीला पाठवले. तर रोहित स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला मात्र धावा करण्यात फ्लॉप ठरला.
दुसरीकडे, या वर्षी भारत दौऱ्यावर निकोलस पूरनला वगळता किरोन पोलार्डच्या विंडीज संघाने प्रत्येक विभागात चाहत्यांची निराशा केली. पूरनने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे 61 आणि 62 धावानीच अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या, मात्र दुसऱ्या टोकाने साथ मिळत नसल्याने विंडीजना दौऱ्यावर एकही विजय मिळवता आला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)