IPL Auction 2025 Live

IND vs WI 2nd T20I: रोहित शर्मा बनला 'सिक्सर किंग', ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेल याला मागे टाकत T20 मध्ये रचला विश्वविक्रम

रोहितने आअतापर्यंत 107 षटकार मारले आहेत. तर गेलने टी-20 मध्ये 105 षटकार ठोकले आहेत.

रोहित शर्मा (Photo by Alex Davidson/Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघात सध्या दुसरा टी-20 सामना रंगला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिले फलंदाजी करत भारताची सलामीची जोडी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. आजच्या या सामन्यात 'हिटमॅन' रोहितने 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल (Chri Gayle) याचा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने आअतापर्यंत 107 षटकार मारले आहेत. तर गेलने टी-20 मध्ये 105 षटकार ठोकले आहेत. (IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिज समोर जिंकण्यासाठी 168 धावांचे आव्हान, रोहित शर्मा 'हिट')

आंतराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम गेलच्या नावावर होता. गेल ऐवजी न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (Martin Guptill)  तिसऱ्या क्रमांकावर आहे. आजवर गप्टिलने 76 सामन्यात 103 षटकार मारले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:

107- रोहित शर्मा (88 सामने)

105 – ख्रिस गेल (58 सामने)

103 – मार्टीन गप्टील (76 सामने)

102 – रोहित शर्मा (94 सामने)

92 – कॉलीन मुनरो (52 सामने)

91 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)